अबब.. साऱ्यांचाच जन्म ब्रिटिश काळातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 10:46 PM2020-09-24T22:46:58+5:302020-09-25T01:22:27+5:30

विल्होळी : विल्होळी व आंबेबहुला येथील नागरिकांची केलेल्या मतदान नोंदणी मोहिमेत काही दिवसांपूर्वी आपली नाव नोंदणी केली असता, त्यातील पहिल्या टप्प्यातील 252 मतदान धारकांचे मतदान कार्ड मिळाले असून, त्यातील सर्वच मतदारांना मिळालेल्या मतदान कार्डवर जन्मतारीख 30 डिसेंबर 1899 अशी जन्म तारीख असल्याने ग्रामस्थ बुचकळ्यात पडले आहेत. साºयानचीच तारीख सारखी असल्याने भविष्यात अनेक प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाचा या गलथान कारभारा विरुद्ध नागरिकांनी आक्षेप नोंदविला आहे.

Abb .. all were born in the British period | अबब.. साऱ्यांचाच जन्म ब्रिटिश काळातील

अबब.. साऱ्यांचाच जन्म ब्रिटिश काळातील

Next
ठळक मुद्देमतदान ओळख पत्राची किमया: ग्रामस्थ बुचकळ्यात

बाबासाहेब गोसावी
विल्होळी : विल्होळी व आंबेबहुला येथील नागरिकांची केलेल्या मतदान नोंदणी मोहिमेत काही दिवसांपूर्वी आपली नाव नोंदणी केली असता, त्यातील पहिल्या टप्प्यातील 252 मतदान धारकांचे मतदान कार्ड मिळाले असून, त्यातील सर्वच मतदारांना मिळालेल्या मतदान कार्डवर जन्मतारीख 30 डिसेंबर 1899 अशी जन्म तारीख असल्याने ग्रामस्थ बुचकळ्यात पडले आहेत. साºयानचीच तारीख सारखी असल्याने भविष्यात अनेक प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाचा या गलथान कारभारा विरुद्ध नागरिकांनी आक्षेप नोंदविला आहे.
कोरोना साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून लॉकडाऊन असल्याने पुढे येणाºया ग्रामपंचायत निवडणुका निवडणूक विभागाने पुढे ढकलून ग्रामपंचायतस्तरावर प्रशासक नेमले आहेत. पुढे येणाºया ग्रामपंचायत निवडणुका लक्षात घेऊन नागरिकांनी मतदान नोंदणी केलेली आहे, त्यामधील पहिल्या टप्प्यातील मतदान नोंदणी धारकांचे मतदान कार्ड निवडणूक आयोगाने तयार केले आहेत व ते मतदारांना वाटप करण्यात आले. मात्र त्यात सर्व मतदारांचे जन्मतारीख 30 डिसेंबर 1899 अशी टाकण्यात आली आहे. एकाच गावातील सर्व मतदारांची तारीख चुकलेली असल्याने ती त्वरित दुरुस्त करून द्यावी, किंवा त्या मतदान धारकांना नवीन मतदान कार्ड देण्यात यावे, अन्यथा पुढे येऊ घातलेल्या ग्रामपंचायत व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये त्या कार्ड वर आक्षेप नोंदविला जाऊ शकतो व मतदान धारकाला आपल्या मतदानापासून वंचित राहावे लागू शकते अशी मागणी मतदारानी केली आहे. यात प्रशांत देशमुख,शिवम देशमुख, ज्ञानेश्वर बर्वे, दौलत पेढेकर, लालू गवारी, बाजीराव बागुल, चंद्रभागाबाई निरसट, आशाबाई सहाने, कांचनबाई नरवाडे, रुक्मिणीबाई यादव, अंजनाबाई चौधरी, पुंडलिक सुपे, दामू कुंदे, ज्ञानेश्वर गडकरी, आदींसह ग्रामस्थ या साºया प्रकाराने संतप्त झाले आहेत.

-प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे आंबेबहुला येथील 252 मतदान धारकांची मतदान कार्ड आले आहे. परंतु त्यातील सर्वच कार्डवर जन्मतारीख चुकीची नमूद केली आहे.
- प्रशांत देशमुख माजी सरपंच आंबेबहुला
 
Web Title: Abb .. all were born in the British period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.