अबब, जिल्ह्यात दिवसभरात दोन हजारांपेक्षा अधिक रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 02:01 AM2020-09-17T02:01:05+5:302020-09-17T02:02:11+5:30
जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वेगाने वाढू लागली असून, बुधवारी (दि. १६) नव्याने २ हजार ४८ रुग्ण आढळून आले. शहरात १ हजार ३०५ नवे रुग्ण, ग्रामीण भागात ६७०, तर मालेगावात ४० रुग्ण आढळून आले.
नाशिक : जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वेगाने वाढू लागली असून, बुधवारी (दि. १६) नव्याने २ हजार ४८ रुग्ण आढळून आले. शहरात १ हजार ३०५ नवे रुग्ण, ग्रामीण भागात ६७०, तर मालेगावात ४० रुग्ण आढळून आले.
यामुळे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता ५७ हजार ९८८ इतकी झाली आहे. जिल्ह्यात दिवसभरात १६ रुग्णांचा उपचारा-दरम्यान मृत्यू झाला. तसेच एक हजार ७२५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. मागील आठवड्यापासून कोरोनाबधित रुग्णांचा आकडा सतत वाढत आहे. रविवारच्या तुलनेने सोमवारी कमी रुग्ण दगावले होते मात्र मंगळवारपासून पुन्हा आकडा वाढला. बुधवारी १६ रुग्ण मृत्युमुखी पडले. यामध्ये शहरातील ६, ग्रामीण ९, मालेगावात १ रुग्णांचा समावेश आहे. आता मृतांचा एकूण आकडा १ हजार १०७ वर पोहचला आहे.
४६ हजार ४०५
रु ग्णांचा कोरोनावर विजय
नाशिक शहरात आतापर्यंत ६१४ तर ग्रामीणमध्ये ३३४ रु ग्ण कोरोनाने मृत्युमुखी पडले आहेत. दिवसभरात जिल्ह्यात २ हजार २७८ संशयित रु ग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४६ हजार ५२९ रु ग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत. सध्या जिल्ह्यात आतापर्यंत ४६ हजार ४०५ रु ग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. तसेच १० हजार ४७६ रु ग्ण उपचार घेत आहेत. १ हजार ५५२ नमुना चाचणी अहवाल आतापर्यंत प्रलंबित आहेत.