तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 01:45 AM2019-08-03T01:45:06+5:302019-08-03T01:46:14+5:30
शहरातील विविध ठिकाणांवरून एकाच दिवशी तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची घटना घडली. यात १६ वर्षांच्या दोन मैत्रिणी व निरीक्षणगृहातील एका मुलीचा समावेश आहे.
नाशिक : शहरातील विविध ठिकाणांवरून एकाच दिवशी तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची घटना घडली. यात १६ वर्षांच्या दोन मैत्रिणी व निरीक्षणगृहातील एका मुलीचा समावेश आहे.
सिडकोतील मोरवाडी परिसरातील दत्तमंदिराजवळ राहणाऱ्या १६ वर्षीय दोघी मैत्रिणी बुधवारी (दि.३१) पहाटे ३ वाजेपासून बेपत्ता असून, या मुलींचे अपहरण झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दुसरी घटना गुरुवारी (दि.१) सकाळी घडली. मुलींच्या निरीक्षणगृहातील १६ वर्षीय मुलगी रोजच्याप्रमाणे रमाबाई कन्या शाळेत गेली, मात्र ती वर्गात न बसताच बाहेर निघून गेल्याची फिर्याद पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.