प्रभारी नगराध्यक्षपदी अभिजित काण्णव

By Admin | Published: May 8, 2017 01:08 AM2017-05-08T01:08:49+5:302017-05-08T01:09:52+5:30

त्र्यंबकेश्वर : येथील नगरपरिषदेच्या प्रभारी नगराध्यक्षपदी अभिजित काण्णव यांची नियुक्ती करण्यात आली

Abhijit Kannav, the in-charge of city's charge, | प्रभारी नगराध्यक्षपदी अभिजित काण्णव

प्रभारी नगराध्यक्षपदी अभिजित काण्णव

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
त्र्यंबकेश्वर : येथील नगरपरिषदेच्या प्रभारी नगराध्यक्षपदी अभिजित काण्णव यांची नियुक्ती करण्यात आली. मान्यवरांच्या उपस्थितीत काण्णव यांनी शनिवारी नगराध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली.
नगराध्यक्ष विजया लढ्ढा रजेवर गेल्याने जिल्हाधिकारी यांनी उपनगराध्य काण्णव यांची प्रभारी नगराध्यक्षपदी निवड केली. त्यानुसार काण्णव यांनी शनिवारी (दि. ६) प्रभारी नगराध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. नगरपालिकेच्या सभागृहात ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक यादवराव तुंगार यांच्या हस्ते नवनिर्वाचित नगराध्यक्ष काण्णव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शहरातील ज्येष्ठ नागरिकांसह युवा वर्ग उपस्थित होता.
सत्काराला उत्तर देताना काण्णव यांनी सांगितले की, ग्रामस्थांच्या सदिच्छा-आशीर्वादाने व नगरसेवकांच्या साथीने मला या पदावर काम करण्याची संधी मिळाली. त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेला राज्य शासनाकडून अडीच कोटी रु पयांचे बक्षीस मिळाल्यानंतर प्रभारी नगराध्यक्षपदी माझी निवड झाल्याने जबाबदारी वाढली आहे. लोकोपयोगी कामांसाठी या बक्षीसरुपी मिळालेल्या रकमेचा उपयोग करण्यास मी कटिबद्ध असेल.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते दीपक लढ्ढा, माजी नगराध्यक्ष सुनील अडसरे व डॉ. दिलीप जोशी, योगेश तुंगार, धनंजय तुंगार, तृप्ती धारणे, यशोदा अडसरे, अनघा फडके, माधुरी जोशी आदींसह सर्व नगरसेवक, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज काण्णव, मनोज थेटे, प्रभाकर काण्णव, सुरेश गंगापुत्र, लक्ष्मीकांत थेटे, विजय शिखरे, किशोर पेंडोळे, शिवसेनेचे शहर संपर्कप्रमुख भूषण अडसरे, शहरप्रमुख सचिन दीक्षित, महेश तानपाठक आदी उपस्थित होते.

Web Title: Abhijit Kannav, the in-charge of city's charge,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.