अभिलाषा बराक : भारतातील पहिल्या हेलिकॉप्टर वैमानिक !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 06:54 AM2022-05-26T06:54:58+5:302022-05-26T06:56:19+5:30

अभिलाषा यांनी १८ आठवड्यांचे हेलिकॉप्टर उड्डाणाचे खडतर व आव्हानात्मक असे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. 

Abhilasha Barak: The first helicopter pilot of india! | अभिलाषा बराक : भारतातील पहिल्या हेलिकॉप्टर वैमानिक !

अभिलाषा बराक : भारतातील पहिल्या हेलिकॉप्टर वैमानिक !

googlenewsNext

नाशिक - भारतीय सेनेत कार्यरत असताना कुठलीही महिला लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिक बनलेली नाही; मात्र हरयाणाच्या रोहतकच्या रहिवासी असलेल्या कॅप्टन अभिलाषा बराक यांनी हा मान मिळविला. त्यांना नाशिकच्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या (कॅट्स) ३७ व्या तुकडीच्या दीक्षांत सोहळ्यात बुधवारी ‘एव्हिएशन विंग’ प्रदान करून गौरविण्यात आले. कॅप्टन अभिलाषा यांनी २०१८ साली चेन्नई अकादमीतील प्रशिक्षण पूर्ण करत आर्मी एव्हिएशन कोरची निवड केली. नाशिकच्या ‘कॅट्स’मध्ये दाखल झाल्या. अभिलाषा यांनी १८ आठवड्यांचे हेलिकॉप्टर उड्डाणाचे खडतर व आव्हानात्मक असे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. 

गुंजन सक्सेनाप्रमाणे ‘चित्ता’चे उड्डाण
हवाई दलात १९९४ साली भरती झालेल्या गुंजन सक्सेना या हेलिकॉप्टर वैमानिकाने कारगिल युद्धात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. भारतीय सैन्य दलातून महिलांना यापूर्वी लढाऊ वैमानिक होण्याची संधी मिळत नव्हती. पहिल्यांदाच महिलांना सैन्यदलातून हेलिकॉप्टर वैमानिक होण्याची संधी उपलब्ध करून दिली गेली. कॅप्टन अभिलाषा बराक यांनी या संधीचे सोने केले. 

 

Web Title: Abhilasha Barak: The first helicopter pilot of india!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.