अस्थिविसर्जनाचा कलश बॅँकेत ठेवून करणार अभिनव आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 02:15 PM2020-01-10T14:15:59+5:302020-01-10T14:16:06+5:30

घोटी: जिल्हा बँकेच्या वाडीव-हे शाखेतून वडिलांच्या नावावर असलेली हक्काची रक्कम जिवंतपणी तर नाहीच पण त्यांच्या मृत्यूनंतरही मिळत नसल्याने मुलाने अस्थिविसर्जनाचा कलश बँकेत ठेवून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

 Abhinav agitation will be held on the bank of bone marrow | अस्थिविसर्जनाचा कलश बॅँकेत ठेवून करणार अभिनव आंदोलन

अस्थिविसर्जनाचा कलश बॅँकेत ठेवून करणार अभिनव आंदोलन

Next

पोलिसात तक्रार : जिल्हा बॅँकेच्या वाडीव-हे शाखेतून पैसे परत मिळत नसल्याची तक्रार

घोटी: जिल्हा बँकेच्या वाडीव-हे शाखेतून वडिलांच्या नावावर असलेली हक्काची रक्कम जिवंतपणी तर नाहीच पण त्यांच्या मृत्यूनंतरही मिळत नसल्याने मुलाने अस्थिविसर्जनाचा कलश बँकेत ठेवून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वाडीव-हे येथील बचत खात्यातील लाखो रूपयांची अडकलेली रक्कम परत मिळत नाही. रक्कम मिळण्यासाठी जिवंतपणी प्रयत्न करूनही रक्कम मात्र मिळाली नाही. शेवटी खातेदाराच्या दशक्रि या विधीसाठी सुद्धा हक्काची रक्कम मिळाली नाही. परिणामी बँकेच्या विरोधात वाडीवर्हे येथील एकनाथ मूर्तडक यांनी पोलिसांकडे तक्र ार केली आहे. वडिलांचे अस्थीविसर्जन न करता बँकेच्या शाखेत अस्थीकलश ठेवून अभिनव आंदोलन करणार असल्याचे सांगण्यात आले.
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सध्या विविध विषयांमुळे चर्चेत असते. नोटाबंदीमुळे मोठ्या विश्वासाने आपल्या ठेवी बँकेत ठेवलेल्या ग्रामीण ठेवीदारांनी हक्काची रक्कम मिळावी म्हणून यासाठी बँकेकडे तगादे लावलेले आहेत. वाडीवºहे येथील एकनाथ मूर्तडक यांची स्थिती काही वेगळी नाही. त्यांचे वडील बाबुराव मूर्तडक यांनी वर्षभरापासुन बँकेच्या वाडीवºहे शाखेत आपल्या बचत खात्यातील लाखो रूपयांची रक्कम मिळावी प्रयत्न केले होते. आजारपणावरील उपचारासाठी त्यांना पैशांची अत्यंत गरज होती. वारंवार चकरा मारून आणि अर्जफाटे करूनही त्यांना स्वत:ची रक्कम मिळाली नाही. दहा दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला. किमान
दशक्रि या विधीसाठी तरी रक्कम द्या अशी एकनाथ मुर्तडक यांची अपेक्षा फोल ठरली. म्हणून मुर्तडक यांनी वडिलांचे अस्थी विसर्जन न करता बँकेत ठेवून अभिनव आंदोलन करणार असल्याचे सांगितले. यासह त्यांनी जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक, विभागीय अधिकारी, शाखाधिकारी यांच्या विरोधात वाडीव-हे पोलिसांकडे तक्र ार दिली आहे.
----------------
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार एका खातेदाराला पाच हजारांपेक्षा जास्त रक्कम देता येत नाही. मुर्तडक यांनाही हेच यापूर्वी लेखी स्वरूपात लिहून दिलेले आहे.
- विलास आहेर, शाखाधिकारी, वाडिव-हे

Web Title:  Abhinav agitation will be held on the bank of bone marrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक