महिला अत्याचाराविरोधात अभाविपची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 01:03 AM2020-02-12T01:03:37+5:302020-02-12T01:04:02+5:30

हिंगणघाट व सिल्लोड येथील महिला अत्याचाराच्या घटनांविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नाशिकमधील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी अशोकस्तंभ येथे एकत्र येऊन मंगळवारी (दि.११) निषेध नोंदवला.

Abhinav protests against women oppression | महिला अत्याचाराविरोधात अभाविपची निदर्शने

महिला अत्याचाराविरोधात अभाविपची निदर्शने

Next

नाशिक : हिंगणघाट व सिल्लोड येथील महिला अत्याचाराच्या घटनांविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नाशिकमधील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी अशोकस्तंभ येथे एकत्र येऊन मंगळवारी (दि.११) निषेध नोंदवला. महाराष्ट्रासह देशभरात महिलांवर होणाºया घटनांची समाजात पुनरावृत्ती घडू नये याकरिता कायद्याचा जरब बसणे आवश्यक आहे, मात्र मुंबईत नाइट लाइफच्या गोष्टी करणारे सरकार राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनांविषयी मूग गिळून गप्प बसल्याचा आरोप करीत अभाविपने सरकारविरोधात निषेध व्यक्त करीत हिंगणघाट व सिल्लोड येथील अत्याचाराच्या घटनांचा जलद तपास करून या गुन्ह्यांचा खटला जलदगती न्यायालयात चालवून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी अभाविपने केली आहे. यावेळी अभाविपचे महानगरमंत्री अथर्व कुळकर्णी, महानगर सहमंत्री सिद्धेश खैरनार, गौरी पवार, राकेश साळुंके, ऐश्वर्या पाटील, वैभव पाटील, उत्कर्षा कुरमभट्टी, नितीन पाटील, हर्षदा कदम आदी उपस्थित होते.

Web Title: Abhinav protests against women oppression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.