शरयूच्या जलाने ‘काळाराम’ला अभिषेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 12:58 AM2018-11-29T00:58:59+5:302018-11-29T00:59:39+5:30
‘सियावर रामचंद्र की जय’ असा जयघोष करत अयोध्येत प्रभू रामचंद्रांचे मंदिर लवकरात लवकर उभे रहावे यासाठी बुधवारी सकाळी शिवसेनेच्या वतीने शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत पंचवटीतील काळाराम मंदिरात मंत्रोच्चारात जलाभिषेक व पूजन करण्यात आले.
पंचवटी : ‘सियावर रामचंद्र की जय’ असा जयघोष करत अयोध्येत प्रभू रामचंद्रांचे मंदिर लवकरात लवकर उभे रहावे यासाठी बुधवारी सकाळी शिवसेनेच्या वतीने शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत पंचवटीतील काळाराम मंदिरात मंत्रोच्चारात जलाभिषेक व पूजन करण्यात आले. अयोध्येतून आणलेल्या शरयू नदीच्या पाण्याने काळाराम मंदिरात ‘श्रीं’च्या मूर्तींना शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी व खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते जलाभिषेक करण्यात आला.
सकाळी राम मंदिरात ‘श्रीं’चे विधिवत पूजन करण्यात येऊन ब्रह्मवृंदाच्या उपस्थितीत मंत्रोच्चारात जलाभिषेक कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी ‘हर हिंदू की यही पुकार पाहिले मंदिर फिर सरकार’, ‘सियावर रामचंद्र की जय’ असा जयघोष केला. जलाभिषेक कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख सुनील पाटील, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, महानगर प्रमुख सचिन मराठे, महेश बडवे, नगरसेवक पूनम मोगरे, प्रवीण तिदमे, वैभव खैरे, सत्यभामा गाडेकर, श्यामला दीक्षित, मंगला भास्कर, ज्योती देवरे, दिलीप मोरे, संतोष ठाकूर, संतोष पेलमहाले, सुनील जाधव, अमोल सूर्यवंशी, योगेश बेलदार, हिमांशू गोसावी, नंदू वराडे, शैलेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.