चैत्र पौणिमेनिमित्त चांदवडच्या श्री रेणुकामातेला अभिषेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:15 AM2021-04-28T04:15:48+5:302021-04-28T04:15:48+5:30
============================= कानडगाव येथे दुचाकी अपघातात एक ठार चांदवड : मनमाड-मालेगाव रोडवर पाणपोई फाट्याजवळ दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात तरुण ठार ...
=============================
कानडगाव येथे दुचाकी अपघातात एक ठार
चांदवड : मनमाड-मालेगाव रोडवर पाणपोई फाट्याजवळ दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात तरुण ठार झाला. मालेगावकडून मनमाडकडे जाणाऱ्या दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीवरील अनिल निवृत्ती कडनोर (२५, रा . चोंडी जळगाव, ता मालेगाव) हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर दुसरा चालक गाडी घेऊन अपघाताची माहिती न देता पळून गेला. याबाबत खंडू दशरथ डुकळे (रा .जळगाव, ता . मालेगाव) यांनी चांदवड पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी दुचाकीस्वार शिवम श्याम आहिरे (रा . धुळे) यांच्या विरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार ए.आर. पवार हे करीत आहेत .
-----------------------------------------------------------------------------
वडाळीभोई शिवारात अपघात; एक ठार
चांदवड : तालुक्यातील वडाळीभोई शिवारात मुंबई-आग्रा महामार्गावर दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात एका चालकाचा मृत्यू झाला. उसवाड येथील विठोबा पंढरीनाथ घुले (४२) हे पिंपळगाव येथून सीटीस्कॅन करून उसवाड येथे दुचाकीने घरी परत जात असताना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने वडाळीभोई वीज वितरण कंपनीच्या सबस्टेशनसमोर जोरदार धडक दिली. या अपघातात घुले हे गतिरोधकावर आदळले. त्यांच्या डोक्यास मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. घुले यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, वडील, दोन मुली असा परिवार आहे. दिगंबर पंढरीनाथ घुले यांनी वडनेर भैरव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अधिक तपास सुरू आहे.
------------------------------------------------------------------------------ चांदवडला दोन दिवसांत ११२ कोरोना रुग्ण
चांदवड : येथे दि. २४ एप्रिल रोजी १२५ व्यक्तीपैकी ३३, तर दि. २६ एप्रिल रोजी ३८९ पैकी ८९ व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने दोन दिवसांत एकूण ११२ नवीन रुग्णांनी भर पडली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण चांदवड शहरातील विविध भागाती आहेत, तर तालुक्यातील विविध गावांतील एकूण ११२ जण पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ .पंकज ठाकरे व तहसीलदार प्रदीप पाटील यांनी दिली. नागरिकांनी मास्क वापरा. विनामास्क आढळून आल्यास दोनशे रुपये दंड वसूल केला जाईल, अशी माहिती तहसीलदार प्रदीप पाटील यांनी दिली.