चतुर चतुरा स्पर्धेत अभिषेक यादव , पायल छाजेड विजेते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 04:21 PM2019-01-10T16:21:48+5:302019-01-10T16:23:49+5:30
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी गुरुवारी (दि. १०) विश्वहिंदी दिवसाचे औचित्य साधून केटीएचएम महाविद्यालयातीव हिंदी विभागातर्फे घेण्यात आलेल्या चतुर-चतुरा स्पर्धेत ८० विद्यार्थ्यांपैकी विज्ञान शाखेतील द्वीतीय वर्षातील अभिषेक यादव व वाणिज्य शाखेतील द्वीतय वर्षाच्या पायल छाजेड यांनी विजेत पद पटकावले आहे.
नाशिक : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी गुरुवारी (दि. १०) विश्वहिंदी दिवसाचे औचित्य साधून केटीएचएम महाविद्यालयातीव हिंदी विभागातर्फे घेण्यात आलेल्या चतुर-चतुरा स्पर्धेत ८० विद्यार्थ्यांपैकी विज्ञान शाखेतील द्वीतीय वर्षातील अभिषेक यादव व वाणिज्य शाखेतील द्वीतय वर्षाच्या पायल छाजेड यांनी विजेत पद पटकावले आहे.
चतुर-चतुरा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी उपप्राचार्य प्रा.डी.आर.पताडे, डॉ.बी.डी.पाटील, हिंदी विभागप्रमुख डॉ. पी. व्ही.कोटमे, हिंदी राष्ट्रभाषा मंच अध्यक्ष माधुरी मोगल, डॉ जगदीश परदेशी, प्रा.श्रीमती मंगला भवर आदी उपस्थित होते. हिंदी विभागातर्फे विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी चतुर-चतुरा स्पर्धा घेण्यात आली. यात अभिव्यक्ती,सामान्यज्ञान गायन,अभिनय कौशल्य या सर्वांचे परीक्षण करून त्यातून विद्यार्थ्यांमधून चतुर व विद्यार्थिनींमधून चतुरा अशी निवड करण्यात आली. सुत्रसंचलन स्वाती गोरडे यांनी तर आभार डॉ जगदीश परदेशी यांनी मानले.
स्पर्धेतील विजेते स्पर्धक
केटीएचएम महाविद्यालयाच्या हिंदी विभागातर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेत चतुर म्हणून विज्ञान शाखेच्या द्वीतीय वषार्तील अभिषेक यादव याच्यासह विद्यार्थींनींमधून चतुरा म्हणूम वाणिज्य शाखेतील द्वीतीय वर्षाच्या पायल छाजेड हिने विजेते पद पटकावले. तर या स्पर्धेत पूनम रामटेके आणि ओमकार पवार यांना उपविजेतपदावर समाधान मानावे लागले.