अभोणा नाभिक समाजाने दिला चित्ते परिवाराला मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2021 05:33 PM2021-01-31T17:33:10+5:302021-01-31T17:34:02+5:30

अभोणा : पुतणीच्या लग्नाची खरेदी आटोपून दुचाकीने नाशिकहुन वणी येथे घरी परतणाऱ्या गुलाब चित्ते (४५) यांचा दिंडोरी ग्रामिण रुग्णालयाजवळ ...

The Abhona nuclear community gave a helping hand to the leopard family | अभोणा नाभिक समाजाने दिला चित्ते परिवाराला मदतीचा हात

अभोणा नाभिक समाजाने दिला चित्ते परिवाराला मदतीचा हात

googlenewsNext
ठळक मुद्दे११ हजार रुपये रोख, १ धान्याचे पोते व साडीचोळी देऊन मदतीचा हात.

अभोणा : पुतणीच्या लग्नाची खरेदी आटोपून दुचाकीने नाशिकहुन वणी येथे घरी परतणाऱ्या गुलाब चित्ते (४५) यांचा दिंडोरी ग्रामिण रुग्णालयाजवळ वाहनास ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अपघात होऊन डिसेंबरमध्ये मृत्यु झाला होता. नाभिक समाजाच्या चित्ते यांचा संसार उघड्यावर पडल्याने वणी नाभिक समाज मंडळाचे कार्यकर्ते तसेच रंगनाथबाबा आश्रमाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासत चित्ते यांच्या परिवारास ११ हजार रुपये रोख, १ धान्याचे पोते व साडीचोळी देऊन मदतीचा हात दिला.

यावेळी सुरेश हिरे, भरत हिरे, वाल्मीक सोनवणे, राजेंद्र हिरे, भाग्येश हिरे, रवी पगारे, नाना वाघ, भगवान जाधव, जीवन सैंदाणे, हेमंत महाले, चेतन हिरे, मोहन जाधव, सुरेश सोनवणे, कैलास हिरे आदी उपस्थित होते. त्यांचा . त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, तीन वर्षाचा मुलगा व सासू असा परिवार आहे. 

Web Title: The Abhona nuclear community gave a helping hand to the leopard family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.