चुकीची माहिती भरलेल्या शिक्षकांना अभय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 12:17 AM2018-07-27T00:17:38+5:302018-07-27T00:23:41+5:30
नाशिक : गेल्या आठवडाभरापासून संशयास्पद शिक्षकांची आणि त्यांच्या कागदपत्रांची चौकशी सुरू असताना या सुनावणीमध्ये नेमके काय आढळत आहे याची कोणतीही माहिती समोर येत नसल्याने दोषी शिक्षकांना अभय दिले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
नाशिक : गेल्या आठवडाभरापासून संशयास्पद शिक्षकांची आणि त्यांच्या कागदपत्रांची चौकशी सुरू असताना या सुनावणीमध्ये नेमके काय आढळत आहे याची कोणतीही माहिती समोर येत नसल्याने दोषी शिक्षकांना अभय दिले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
अखेरच्या रॅण्डम राउंडमध्ये अवघड क्षेत्रात बदली झाल्याने या शिक्षकांनी न्यायासाठी जिल्हा परिषदेपासून, विभागीय आयुक्त तसेच न्यायालयाचेदेखील दरवाजे ठोठावले आहेत. जिल्हा परिषदेला सर्व प्रकारच पुरावे देऊनही जिल्हा परिषदेने नेमकी कशी तपासणी केली आणि कागदपत्रांची सतत्या कशी तपासून पाहिली याची माहितीच समोर येत नसल्याने ही संपूर्ण यंत्रणा चुकीच्या शिक्षकांना अभय देण्याच्या मानसिकतेत असल्याचा संशय आहे.
गेल्या २० तारखेपासून संशयास्पद शिक्षकांची आणि त्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. प्रत्यक्ष संबंधित शिक्षकांनादेखील बाजू मांडण्यास सांगितले जात आहे. मात्र हा चौकशीचा निव्वळ फार्स असून, अनेक शिक्षकांची कागदपत्रे बनावट आढळली असूनही असे किती शिक्षक जिल्हा परिषदेच्या रडारवर आहेत याची माहिती मात्र दिली जात नाही.
ग्रामसेवक असो की अंगणवाडीसेविका, अधिकाऱ्यांची वेतनवाढ रोखणे असो की चुकीची माहिती दिल्याने ग्रामसेवकाचे निलंब, मुख्य कार्यकारी अधिकारी प्राधान्याने याची माहिती माध्यमांपर्यंत पोहचवित असतात. परंतु चुकीच्या बदल्या पदरात पाडून घेताना शासानची दिशाभूल करणाºया संबंधित शिक्षकांवरील कारवाईबाबत कोणतीही भूमिका घेत नसल्यामुळे जिल्हा परिषदेच्या एकूणच चौकशी प्रकरणावर संशय व्यक्त करण्यात येत आहे. शासनाच्या आदेशाप्रमाणे जिल्हा परिषदेने दि.२०तारखेपर्यंत संशयास्पद शिक्षकांची चौकशी, सुनावणी करून त्यांच्यावर कारवाई, नवीन पदस्थापना आणि अन्यायग्रस्तांना न्याय देण्याचे आदेश जिल्हा परिषदेला दिलेले आहेत. मात्र दि.२६ तारीख उलटूनही जिल्हा परिषदेकडून अद्याप दोषी शिक्षकांबाबतची भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.
न्यायालयावरच आता शिक्षकांची भिस्त
जिल्हा परिषदेकडून न्यायाची अपेक्षा नसल्याने अन्यायग्रस्त शिक्षकांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. या प्रकरणाची सुनावणी येत्या मंगळवारी होणार असून, न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वच शिक्षकांचे लक्ष लागले आहे. संपूर्ण बदलीप्रक्रिया ही सदोष असल्याने आॅनलाइन मधील दुरुस्तीसह संपूर्ण प्रक्रियाच नव्याने राबविण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली असल्याने सुनावणीकडे लक्ष लागून आहे.