अबोल भावनांची गोष्ट : ‘अब बारीश...’हिंदी नाट्य : मुंबईच्या मानवता असोसिएशनच्या वतीने सादरीकरण

By admin | Published: January 30, 2015 12:35 AM2015-01-30T00:35:55+5:302015-01-30T00:40:37+5:30

अबोल भावनांची गोष्ट : ‘अब बारीश...’हिंदी नाट्य : मुंबईच्या मानवता असोसिएशनच्या वतीने सादरीकरण

Abol Emotions: 'Now Barish ...' Hindi drama: Presentation by the Humanity Association of Mumbai | अबोल भावनांची गोष्ट : ‘अब बारीश...’हिंदी नाट्य : मुंबईच्या मानवता असोसिएशनच्या वतीने सादरीकरण

अबोल भावनांची गोष्ट : ‘अब बारीश...’हिंदी नाट्य : मुंबईच्या मानवता असोसिएशनच्या वतीने सादरीकरण

Next

नाशिक : एका मुद्द्यावरून ‘त्या’ दोघांत मतभेद होतात... त्यातून मार्ग निघतो; मात्र सुरू होतो पन्नास वर्षांचा अबोला... आयुष्याच्या संध्याकाळी एका क्षणी दोघांनाही आपली चूक समजते आणि आकाश मोकळे होते...
महाराष्ट्र हौशी हिंदी नाट्य स्पर्धेत मुंबईच्या दी मानवता असोसिएशनच्या वतीने गुरुवारी ‘अब बारीश रुक जानी चाहिए’ हे नाटक सादर झाले. एका गावातील आदर्श शिक्षक व त्याच्या पत्नीची गोष्ट त्यातून साकारण्यात आली. विवाहानंतर या शिक्षकाची पत्नी नोकरी करण्याची इच्छा बोलून दाखवते. मात्र शिक्षक तिला नकार देतो. आपली नोकरी करण्याची इच्छा प्रत्यक्षात उतरावी, यासाठी ती बराच प्रयत्न करते.
अखेर ती ‘नोकरीला परवानगी दिली, तरच तुमची मुले जन्माला घालीन’ अशी अट पतीला घालते. नंतर नोकरी आणि मूल या विषयावर कोणीच काही बोलत नाही. अबोलपणे संसार सुरू राहतो. पन्नास वर्षांनंतर दोघेही म्हातारे होतात. एके दिवशी पावसाळ्यात कुत्र्याचे एक पिलू अनाहूतपणे त्यांच्या घरात येते. त्या पिलावरून हे दोघे पती-पत्नी पुन्हा एकमेकांशी बोलू, भांडू लागतात. दोघांनाही आपली चूक उमगते, असा नाटकाचा आशय आहे.

Web Title: Abol Emotions: 'Now Barish ...' Hindi drama: Presentation by the Humanity Association of Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.