सुमारे ३०० जणांचा एकाच घरावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 12:28 AM2019-03-25T00:28:43+5:302019-03-25T00:28:57+5:30
जागेचा ताबा मिळविण्याच्या वादावरून सुमारे दोनशे तरुण आणि शंभर महिलांनी एका घरात घुसून धुडगूस घातल्याने परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.
देवळाली कॅम्प : जागेचा ताबा मिळविण्याच्या वादावरून सुमारे दोनशे तरुण आणि शंभर महिलांनी एका घरात घुसून धुडगूस घातल्याने परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. या हल्ल्यात घरातील दागिन्यांची लूट करण्याबरोबरच अनेक वस्तू लंपास केल्याची घटना रविवारी सकाळी घडली. याप्रकरणी पोलिसांनी ४७ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, १२ जणांना अटक करण्यात आली आहे.
जागेचा ताबा मिळविण्याच्या वादावरून बालगृहरोडवरील दशरथ पाळदे यांच्या घरात घुसून जमावाने धुडगूस घातल्याचे फिर्यादित म्हटले आहे. या हल्ल्यात घरातील सोन्याचे ऐवज, मौल्यवान वस्तू लंपास केल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.
दशरथ पाळदे यांच्या घरासमोर अचानकपणे मोठा जमाव जमू लागला. जमावाने अचानक घरात येत पाळदे यांच्यावर गज व काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान, घरातील अन्य महिला व मुले यांनाही मारहाण करण्यात आली. यामुळे पाळदे कुटुंबीयांची धावपळ उडाली. नागरिकांनी सदर घटनेबाबत आयुक्तालयात माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
वाहनावर नगरसेवक लोगो
रविवारी सकाळी लॅमरोडच्या जागेसंदर्भात चारशे-पाचशे गुंडाचे टोळके आणल्यानंतर स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे दोन चारचाकी व दोन मालवाहतूक गाड्या जप्त करण्यात आल्या. जमा केलेल्या दोन्ही वाहनांवर नाशिक मनपाचे बोधचिन्ह आहे. सदर वाहने आणणारा व जागा ताब्यात घेणारा नाशिक मनपाचा नगरसेवक असल्याची चर्चा आहे.