नाशिक शहरात सुमारे साडेसहा हजार कोविड बेड रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:12 AM2021-06-03T04:12:04+5:302021-06-03T04:12:04+5:30

नाशिक शहरात कोरोनाबाधितांची संख्या गेल्या मार्च आणि एप्रिल महिन्यांत इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली की, त्यावेळी एकेक बेड मिळणे कठीण ...

About six and a half thousand Kovid beds are vacant in Nashik city | नाशिक शहरात सुमारे साडेसहा हजार कोविड बेड रिक्त

नाशिक शहरात सुमारे साडेसहा हजार कोविड बेड रिक्त

Next

नाशिक शहरात कोरोनाबाधितांची संख्या गेल्या मार्च आणि एप्रिल महिन्यांत इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली की, त्यावेळी एकेक बेड मिळणे कठीण झाले होते. अगदी जनरल बेडसाठीसुद्धा महापालिकेकडे धाव घेऊन एक तरी बेड मिळवून द्या असे आर्जव केले जात होते. मात्र, आता स्थिती बदलली आहे. मे महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या घटल्याने आता बेडसाठी धावाधाव संपली असून, बेड मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. नाशिक शहरात १८८ कोविड रुग्णालये आहेत. त्यात एकुण ८ हजार २१४ बेडस् उपलब्ध आहेत. म्हणजेच सध्या १८०४ बेडस् वापरात आहेत. यात जनरल बेड तसेच आयसीयू ऑक्सिजन अशा सर्वच बेडसचा समावेश आहे. यात ३ हजार १३२ पैकी २ हजार २८२ बेडस् उपलब्ध आहेत. तसेच ३७०२ ऑक्सिजन बेडपैकी २७२३ बेडस् उपलब्ध आहेत. आयसीयूच्या ११०३ पैकी ८६२, तर व्हेंटिलेटर्सच्या ८३८ पैकी ५४३ बेडस् सध्या उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे कोविड केअर सेंटरमध्ये २ हजार ३९७ बेडस् पैकी १६७२ बेडस् उपलब्ध आहेत.

इन्फो...

शहरात सध्या ३४७९ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी २ हजार ५५० रुग्णच रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर १ हजार २९ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत.

Web Title: About six and a half thousand Kovid beds are vacant in Nashik city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.