येवल्यात गणेशमुर्ती तयार करण्याची लगभग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 02:23 PM2018-08-20T14:23:51+5:302018-08-20T14:24:01+5:30
मानोरी : अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव सण येऊन ठेपला आहे.सगळीकडेच लाडक्या गणरायाच्या आगमनाची आणि तयारीची आस गणेशभक्तांना लागली आहे.यात प्रामुख्याने कलाकारांची कला गणरायाची आकर्षण वेधून घेणारी असतात.
मानोरी : अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव सण येऊन ठेपला आहे.सगळीकडेच लाडक्या गणरायाच्या आगमनाची आणि तयारीची आस गणेशभक्तांना लागली आहे.यात प्रामुख्याने कलाकारांची कला गणरायाची आकर्षण वेधून घेणारी असतात. कलाकार आपल्या वेगवेगळ्या कलेनुसार गणपतीची मुर्ती तयार करत असतात.मागील काही वर्षांपासून लोकांचा गणपती घेण्याचा कल इको फ्रेंडली गणपती मूर्तीकडे आहे. ही मूर्ती पर्यावरणाला पूरक आणि पर्यावरणाची हानी होणार नाही अशा शाडूच्या मातीच्या मूर्ती बनवण्याला जास्त पसंती गणपती कलाकार देत आहे. येवला तालुक्यातील मुखेड येथील रहिवासी वाल्मिक रोकडे यांनी आपल्या वडिलोपार्जित सुरू असलेला गणपती मूर्ती, देवीच्या मूर्ती, तसेच थंड पाणी राहण्याचे माठ तयार करण्याचा सुमारे तीस वर्षांपासूनचा व्यवसाय आजही सुरळीतपणे चालू ठेवला आहे.पर्यावरणाला कोणतीही हानी होणार नाही याची विशेष काळजी घेऊन रोकडे कुटुंब शाडूची मातीपासून इकोफ्रेंडली गणपती तयार करण्यात व्यस्त आहे. डिसेंबर महिन्यापासून गणपतीची मूर्ती या ठिकाणी तयार करण्यास सुरु वात केली जाते. या आठ महिन्याच्या कालावधीत सुमारे चार हजार नगापर्यंत गणपतीची वेगवेगळ्या रूपात मूर्ती तयार केल्या जातात. ५१ रूपयांपासून ते दहा ते बारा हजार रु पये किमतीचे गणपती या ठिकाणी तयार केले जातात. सुमारे सात फुटांपर्यंत गणपतीची आकर्षक अशी गणपतीची मूर्ती तयार केली जाते.रोकडे यांच्या या आकर्षक कलेपासून तयार करण्यात आलेल्या गणपतीची मूर्तीला दुसऱ्या जिल्ह्यात मोठी मागणी असते.पुणे,पिंपरी - चिंचवड, नाशिक या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गणपतीला मागणी असते.यात शिवाजी रोकडे,वाल्मिक रोकडे,आण्णा रोकडे आणि बाळासाहेब रोकडे यांनी आत्मसात केलेल्या या कलेला व तयार केलेल्या विविध प्रकारच्या वस्तुंना बघण्यासाठी अनेक नागरिक बघण्यासाठी येत असतात. आता रंगरंगोटीची कामे वेगाने सुरू असून आता केवळ प्रतीक्षा लागून आहे ती गणेश चतुर्थीची.