अबब...! अहो, कोथिंबिरीची एक जुडी चक्क ३३१ रूपयाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 09:21 PM2019-07-16T21:21:12+5:302019-07-16T21:22:47+5:30
गेल्या काही दिवसांपासून कोथिंबिरीचे दर दिवसेंदिवस वाढत चालल्याने कोथिंबिरीच्या दोन काड्या खरेदीसाठी महिलांना कमीत कमी दहा ते पंधरा रु पये किरकोळ बाजारात मोजावे लागत आहे.
संदीप झिरवाळ, नाशिक : कोथिंबिरीची एक जुडी आतापर्यंत आपण १५, २०, २५ खूप झाले तर ५० रूपयांपर्यंत खरेदी केली असाल; मात्र नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (दि.१६) कोथिंबिरची एक जुडी चक्क ३३१ रूपयांपर्यंत पोहचली. ३३ हजार १०० रूपये शेकडा याप्रमाणे लिलावाचा भाव फुटला. कोथिंबिरचा स्वाद घेणे महाग झाले असून पावसाने दडी मारल्याचा थेट परिणाम आवकवर झाला आहे.
गेल्या महिनाभरापासून कोथिंबिरसह अन्य शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांच्या स्वयंपाक घरातून कोथिंबीर पूर्णपणे गायब झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोथिंबिरीचे दर दिवसेंदिवस वाढत चालल्याने कोथिंबिरीच्या दोन काड्या खरेदीसाठी महिलांना कमीत कमी दहा ते पंधरा रु पये किरकोळ बाजारात मोजावे लागत आहे. मंगळवारी सायंकाळी बाजारसमितीत विक्रीसाठी आलेल्या कोथिंबिर शेतमालाला ३३ हजार १०० रु पये शेकडा असा हंगामातील व बाजारसमितीच्या इतिहासातील सर्वाधिक उच्चांकी बाजारभाव मिळाला.
काही वर्षांपूर्वी आडत सुरू असताना कोथिंबीर २७ हजार रु पये शेकडा प्रति दराने विक्र ी झाली होती. मंगळवारी कोथंबीर जुडीला ३३१ रु पये असा इतिहासातील उच्चांकी तीन आकडी बाजारभाव मिळाला असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.
कळवण तालुक्यातील औत्यपाणी येथील शेतकरी काशिनाथ बाळु कामडी यांनी विक्र ीसाठी आणलेल्या कोथिंबिरीच्या प्रति जुडीला ३३१ रु पये असा बाजारभाव मिळाला. नाशिक बाजारसमितीत आडत बंद झाल्यानंतर पहिल्यांदा उच्चांकी बाजारभाव मिळाल्याचे कृषी उत्पन्न बाजारसमिती संचालक चंद्रकांत निकम यांनी सांगितले. कामडी यांनी शिवांजली व्हेजिटेबल कंपनीत कोथिंबिर शेतमाल विक्र ीसाठी आणला होता.
गेल्या काही दिवसांपासून कोथंबीर प्रति जुडीला शंभर, दीडशे, दोनशे, सव्वा दोनशे ते थेट अडीचशे रुपये असा बाजारभाव मिळत आहे. भाव वाढत चालल्याने ग्राहकांना कोथिंबीर घेण्यासाठी कमीत कमी शंभर रूपये मोजावी लागत आहे. सध्या स्वयंपाक घरातून कोथिंबीर गायब झाली आहे. पावसाचे काही तालुक्यांत उशिराने आगमन झाले; मात्र पुन्हा आठवडाभरापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे कोथिंबिरीचे बाजारभाव गगनाला भिडल्याने सर्वसामान्य ग्राहकांचे तोंडचे पाणी पळाले आहे तर कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांनी उच्चांकी बाजारभाव मिळाल्याने समाधान व्यक्त केले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्र ीसाठी आलेला कोथंबीर माल दत्तू अपसूंदे या व्यापाºयाने खरेदी केला तर अन्य व्हेजिटेबल कंपनीत कोथंबीर दोनशे, सव्वा दोनशे, अडीचशे, तीनशे रु पये प्रति जुडी दराने विक्र ी झाल्याचे बाजारसमितीच्या सूत्रांनी सांगितले. साईनाथ व्हेजिटेबल कंपनीत देखील ३३० रु पये प्रति जुडी दराने कोथंबीर, ६० रु पये जुडी मेथी तर ४५रूपये शेपू जुडी विक्र ी झाली असे राजू भोरे यांनी सांगितले.