नाशिक सराफा दरोड्यातील फरारी ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 11:01 PM2019-04-05T23:01:17+5:302019-04-05T23:02:45+5:30

मनमाड : नाशिकच्या सराफा दुकानावर दरोडा टाकत पोलिसांवर गोळीबार करून फरार झालेल्या दोन दरोडेखोरांना मनमाड रेल्वेस्थानकावर जेरबंद करणाऱ्या रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाचा नाशिकचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी प्रशस्तिपत्र देऊन गौरव केला. वर्दीच्या पाठीवर मिळालेली शाबासकीची थाप गुन्हेगारी विरोधात काम करणाऱ्या रेसुब कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढविणारी आहे.

The absconding accused in the Nashik bullion dock | नाशिक सराफा दरोड्यातील फरारी ताब्यात

मनमाड रेसुब निरीक्षक के.डी. मोरे यांच्यासह पथकाचा गौरव करताना नाशिकचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील.

Next
ठळक मुद्देमनमाड : रेल्वे सुरक्षा बलाची कामगिरी; वरिष्ठांकडून शाबासकीची थाप

मनमाड : नाशिकच्या सराफा दुकानावर दरोडा टाकत पोलिसांवर गोळीबार करून फरार झालेल्या दोन दरोडेखोरांना मनमाड रेल्वेस्थानकावर जेरबंद करणाऱ्या रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाचा नाशिकचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी प्रशस्तिपत्र देऊन गौरव केला. वर्दीच्या पाठीवर मिळालेली शाबासकीची थाप गुन्हेगारी विरोधात काम करणाऱ्या रेसुब कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढविणारी आहे.
नाशिक दरोडा प्रकरणातील दोन दरोडेखोर पोलिसांवर गोळीबार करून मोटारसायकलने पळून गेले होते. मनमाड येथून ते रेल्वेने नांदेडकडे जाण्याच्या तयारीत होते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर रेसुब निरीक्षक के.डी. मोरे यांच्यासह के. सिंग, आर. एम. शिंदे, ए.एन. देवरे, डी. के. तिवारी, बी.बी. चव्हाण, एस.एस. घाटोले, शाबीर शहा, सुरेंद्र्र कुमार, संतोष जायभावे आदींच्या पथकाने तातडीने रेल्वे स्टेशन परिसर पिंजून काढला. त्यांना फलाट क्रमांक सहावर दोन्ही आरोपी आढळून आले. रेसुब कर्मचाºयांना पकडण्यासाठी गेले असता दरोडेखोरांनी पलायन केले. मात्र त्यांचा पाठलाग करून त्यांना जेरबंद करण्यात आले. रेसुबने केलेल्या या कामगिरीची दखल घेऊन नाशिकचे पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी रेसुब निरीक्षक के.डी. मोरे व त्यांच्या पथकाचा प्रशस्तिपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.

Web Title: The absconding accused in the Nashik bullion dock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.