फरार झालेला ‘तो’ रिक्षाचालक ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 12:51 AM2019-12-22T00:51:18+5:302019-12-22T00:51:44+5:30
एरवी हाणामारी तर कधी लूटमार यांसारख्या अनेक गंभीर गुन्ह्यात सापडणाऱ्या रिक्षाचालकांनी आता तर थेट रिक्षात बसलेल्या प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे. म्हसरूळ शिवारातील दिंडोरीरोडवर एका रिक्षातून उतरल्यानंतर रिक्षाचालकाने प्रवाशाची रोकड व तब्बल ८ तोळे सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह सुमारे २ लाख ५७ हजार २०० रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा करणाºया रिक्षाचालकास म्हसरूळ गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या.
पंचवटी : एरवी हाणामारी तर कधी लूटमार यांसारख्या अनेक गंभीर गुन्ह्यात सापडणाऱ्या रिक्षाचालकांनी आता तर थेट रिक्षात बसलेल्या प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे. म्हसरूळ शिवारातील दिंडोरीरोडवर एका रिक्षातून उतरल्यानंतर रिक्षाचालकाने प्रवाशाची रोकड व तब्बल ८ तोळे सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह सुमारे २ लाख ५७ हजार २०० रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा करणाºया रिक्षाचालकास म्हसरूळ गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुरु वारी (दि.१९) दुपारी ३ वाजेच्या सुमारास मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर ही घटना घडली होती. याबाबत म्हसरूळ शिवारात राहणारे सतीश गुलाबराव निकम यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्र ार दाखल केली. निकम यांच्या पत्नी व अन्य नातेवाईक साखरपुड्याच्या कार्यक्रम आटोपून रिक्षातून प्रवास करत दिंडोरीरोडवरील एका पेट्रोल पंपसमोर रस्त्यावर उतरले.
त्यावेळी निकम यांच्या स्नुषा त्यांच्या दागिन्यांची पर्स रिक्षातच विसरल्या. रिक्षाचालकाच्या ही बाब लक्षात येताच त्याने निकम यांच्या हातातून प्रवासी दराची रक्कम हिसका देत घेतली. भरधाव रिक्षा घेऊन पर्ससह पोबारा केला. निकम यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक विठ्ठल माळी, सहायक उपनिरीक्षक संजय पवार, हवालदार सुरेश माळोदे, संजय राऊत, मंगेश दराडे, किशोर रोकडे, राजू टेमगर यांनी तत्काळ फरार रिक्षाचालकाचा हद्दीत शोध सुरू केला. यावेळी गस्तीदरम्यान गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार पथकाने आडगाव चौफुलीवर सापळा रचला. संशयित रिक्षाचालक रिक्षा (एमएच १५ एफयू २३२२) घेऊन चौफुलीवर आला असता पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. संशयित सुभाष हरलाल जाधव (३८, रा. विडी कामगारनगर, अमृतधाम) याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षासह निकम यांची दागिन्यांसह रक्कम पोलिसांनी हस्तगत केली. या गुन्ह्यात रिक्षा जप्त करण्यात आली आहे.
‘बळीमहाराज’ शब्दावरून सुगावा
दिंडोरीरोडवर घडलेल्या घटनेदरम्यान निकम व त्यांच्या कुटुंबीयांनी रिक्षाचा क्रमांक बघितलेला नव्हता. रिक्षाच्या पाठीमागे हुडवर ‘बळीमहाराज’ असा शब्द वाचल्याचे त्यांच्या लक्षात राहिले. यावरून पोलिसांनी रिक्षाचा सुगावा लावला.