अट्टल घरफोड्या ‘इंद्या’स अटकवर्षभरापासून होता फरार
By admin | Published: June 15, 2014 12:59 AM2014-06-15T00:59:10+5:302014-06-15T18:25:13+5:30
: पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त
इंदिरानगर : पोलिसांच्या नाकीनव आणणारा व वर्षभरापासून फरार असलेला अट्टल घरफोड्या ‘इंद्या’सह त्याच्या दोन साथीदारांना इंदिरानगर पोलिसांनी शिताफ ीने अटक केली़ या तिघांकडून सुमारे पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, शहरातील अनेक घरफोड्या उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे़
वडाळागाव परिसरात भुरट्या चोऱ्या, चेन स्नॅचिंग, घरफोड्या करण्यात पटाईत असलेला अट्टल गुन्हेगार इंद्या ऊर्फ विशाल वसंत बंदरे (१९, सावित्रीबाई झोपडपट्टी) हा गेल्या वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा देत होता़ तो वडाळागावात आल्याची गुप्त माहिती इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गोपनीय विभागाला मिळाली़ त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे व त्यांची टीम वडाळागावात पोहोचली़ पोलिसांना पाहताच इंद्याने नेहमीप्रमाणे पलायनास सुरुवात केली असता पोलिसांच्या टीमने त्याला शिताफ ीने पकडले़
पोलिसांनी इंद्याची कसून चौकशी केली असता त्याने साथीदार संशयित विशाल संजय बोरसे (२०, रा़ शिंदे, पळसे) याच्या मदतीने
घरफ ोड्या केल्याची कबुली दिली़ या चोरीतील एक एलसीडी टीव्ही संशयित अस्लम शेख (३०, रा़ सावित्रीबाई झोपडपट्टी) याला विकला असल्याची माहिती दिल्यानंतर हा एलसीडी पोलिसांनी जप्त केला़ दरम्यान, या तिघाही संशयितांकडून पन्नास हजार रुपयांचा ऐवज जप्त केला़ त्यामध्ये एलसीडीसह चांदीच्या दागिन्यांचाही समावेश आहे़
पोलीस उपआयुक्त डॉ़ डी़ एस़ स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही़ डी़ श्रीमनवार, सहायक पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे यांच्यासह गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली़(वार्ताहर)