योजनाचालक फरार : कोट्यवधी रुपयांचा अपहार; उत्तर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी फसवणूक ‘लकी ड्रॉ’ योजनेच्या नावाखाली गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 01:23 AM2017-11-11T01:23:08+5:302017-11-11T01:24:05+5:30

दरमहा चारशे ते सातशे रुपये सभासदांकडून गोळा करून लकी ड्रॉच्या माध्यमातून वस्तू देण्याचे आमिष दाखविणाºया ‘गायत्री मार्केटिंग’ या योजनेच्या चालकांनी हजारो नागरिकांकडून पैसे गोळा करून पोबारा केल्याची तक्रार या प्रकरणात फसवणूक झालेल्या सभासदांनी केला असून, सदर योजनाचालकांनी नाशिकसह उत्तर महाराष्टÑात ठिकठिकाणी अशाप्रकारे योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये गोळा करून गंडविल्याचे स्पष्ट झाले आहे.

Absconding pilot: crores worth of rupees; In many parts of North Maharashtra, cheating under the name of 'Lucky Draw' scheme | योजनाचालक फरार : कोट्यवधी रुपयांचा अपहार; उत्तर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी फसवणूक ‘लकी ड्रॉ’ योजनेच्या नावाखाली गंडा

योजनाचालक फरार : कोट्यवधी रुपयांचा अपहार; उत्तर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी फसवणूक ‘लकी ड्रॉ’ योजनेच्या नावाखाली गंडा

googlenewsNext
ठळक मुद्दे विशिष्ट तारखेला लकी ड्रॉ काढण्याचे आमिष एलएडी दूरदर्शन संच देण्याचे कबूल प्रत्येक तालुक्यात व गावात एजंट

नाशिक : दरमहा चारशे ते सातशे रुपये सभासदांकडून गोळा करून लकी ड्रॉच्या माध्यमातून वस्तू देण्याचे आमिष दाखविणाºया ‘गायत्री मार्केटिंग’ या योजनेच्या चालकांनी हजारो नागरिकांकडून पैसे गोळा करून पोबारा केल्याची तक्रार या प्रकरणात फसवणूक झालेल्या सभासदांनी केला असून, सदर योजनाचालकांनी नाशिकसह उत्तर महाराष्टÑात ठिकठिकाणी अशाप्रकारे योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये गोळा करून गंडविल्याचे स्पष्ट झाले आहे.
गुजरातेतील वापी येथील ‘मॉँ गायत्री मार्केटिंग’ अशा नावाने नाशिक शहरातील ठक्कर बजार येथील गाळा नंबर जीएफ १४ मध्ये १४ मे २०१६ रोजी ही योजना सुरू करण्यात आली होती. पंधरा महिन्यांसाठी असलेल्या या योजनेत सभासदांनी साडेचारशे ते सातशे रुपये दरमहा योजनेच्या कार्यालयात जमा करण्याचे व त्यातून दर महिन्याच्या विशिष्ट तारखेला लकी ड्रॉ काढण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. या ड्रॉमध्ये नॅनो कार, दुचाकी अशा वीस वस्तू दरमहा वाटप करायचे व ज्यांना ड्रॉ लागलाच नाही, त्यांना पंधरा महिन्यांनंतर जमा होणाºया ९४०० रुपयांच्या मोबदल्यात क्राउन कंपनीचा एलएडी दूरदर्शन संच देण्याचे कबूल केले होते. चारशे ते सातशे रुपयांच्या मोबदल्यात हजारो रुपये किमतीच्या दुचाकी मिळणार असल्याचे आमिष दाखविण्यात आले. या योजनेसाठी सभासद गोळा करण्यासाठी आयोजकांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात व गावात एजंट नेमले. या नेमलेल्या एजंटच्या माध्यमातून सभासद करण्यात आले. गायत्री मार्केटिंग कंपनीने नाशिकमध्ये सुरू केलेल्या या योजनेसाठी ९९९९ इतके सभासद नेमण्याचे उद्दिष्ट ठेवले असले तरी, प्रत्यक्षात त्यापेक्षाही अधिक सभासद या योजनेत करण्यात आल्याचे तक्रारदार सभासदांचे म्हणणे आहे.

Web Title: Absconding pilot: crores worth of rupees; In many parts of North Maharashtra, cheating under the name of 'Lucky Draw' scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.