विशेष उपक्रमाने गैरहजर विद्यार्थी झाले नियमित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 11:26 PM2019-12-06T23:26:45+5:302019-12-07T00:35:36+5:30

सिन्नर तालुक्यातील दापूर येथील जिल्हा परिषद शाळेत केंद्र सरकारच्या धर्तीवर आधारित डिझाईन फॉर चेंजेस उपक्रम राबविण्यात आला. गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे प्रबोधन करण्यासाठी या उपक्रमाचा लाभ झाला आहे.

Absent students became regular with special activities | विशेष उपक्रमाने गैरहजर विद्यार्थी झाले नियमित

विशेष उपक्रमाने गैरहजर विद्यार्थी झाले नियमित

googlenewsNext
ठळक मुद्देदापूर : डिझाईन फॉर चेंजेस उपक्रमातून पालकांचे प्रबोधन; केंद्र सरकारचा वेब पोर्टलवर उपक्रम

सिन्नर : तालुक्यातील दापूर येथील जिल्हा परिषद शाळेत केंद्र सरकारच्या धर्तीवर आधारित डिझाईन फॉर चेंजेस उपक्रम राबविण्यात आला. गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे प्रबोधन करण्यासाठी या उपक्रमाचा लाभ झाला आहे.
दापूर शाळेचे उपक्रमशील शिक्षक गोरक्ष सोनवणे यांनी आपल्या इयत्ता पहिलीच्या वर्गासाठी प्रभावी अंमलबजावणी करीत त्याची नोंद केंद्र सरकारने दिलेल्या वेबपोर्टलवर केली आहे. यासाठी सोनवणे यांनी पहिलीमध्ये सतत गैरहजर राहणाºया विद्यार्थ्यांना शाळेत नियमित आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहे. उपक्रमाची कार्यवाही करत असताना गैरहजर विद्यार्थी पालकांचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप बनवला आहे. त्यानंतर जो विद्यार्थी शाळेतून गैरहजर राहतो त्या विद्यार्थ्यांच्या पालकाला लगेच फोन करायचा. पहिले काही महिने पालक फोनवर टाळाटाळ करायचे मात्र त्यानंतर उपक्रमात तीन महिने सतत सातत्य ठेवले. पालकांना शिक्षकांना फोन आला की लगेच शाळेत पाठवतो, आणून सोडतो अशा प्रतिक्रिया यायला लागल्या आहेत.
यानंतर आता व्हॉट्सअ‍ॅप गु्रपवर पाल्याला अभ्यास देण्यात येऊ लागला आहे. मुले नियमित अभ्यास करू लागली आहेत. ग्रुपवर अभ्यास देऊ लागल्यामुळे पालकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. पालकांमध्ये गु्रपवर अभ्यास पाहून तो करून घेण्याची जाणीव-जागृती या उपक्र मातून झाली आहे. यामुळे शाळेत विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती दिसू लागली आहे. शाळेतील सर्वच वर्गात हा उपक्र म सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू झाला. वर्गनिहाय व्हॉट्सअ‍ॅप गु्रप तयार करण्यात आले आहे. गैरहजर विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करून त्यांना सातत्याने शाळेत हजर ठेवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शाळेच्या एकंदरीत उपस्थितीत कमालीची वाढ जाणवू लागली. उपस्थितीच्या वाढीमुळे गुणवत्तेसंदर्भात शिक्षक यांना मदत मिळू लागली.
डिझाईन फॉर चेंजेस म्हणजेच शिक्षक किंवा व विद्यार्थी यांनी आपल्या शाळेत वेगळ्या पद्धतीने कार्यवाही करून वेगळेपणाने केलेली कृती होय व अशा कृतीचे व्हिडीओ, आॅडिओ केंद्र सरकारला लिंकद्वारे पाठवायचे असे या उपक्र माचे स्वरूप आहे. राज्यभरातून जवळपास दोन हजार उपक्र म यावर्षी नोंदवले गेले असून, त्यात दापूर शाळेने सहभाग घेतला आहे.

Web Title: Absent students became regular with special activities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.