गैरहजर विद्यार्थ्यांना परीक्षेची पुन्हा संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:18 AM2021-09-17T04:18:43+5:302021-09-17T04:18:43+5:30

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बी.ए. प्रथम वर्ष उर्दू ,हिंदी, बी.कॉम. आणि ग्राहक सेवा या शिक्षणक्रमाच्या ...

Absent students re-examine | गैरहजर विद्यार्थ्यांना परीक्षेची पुन्हा संधी

गैरहजर विद्यार्थ्यांना परीक्षेची पुन्हा संधी

Next

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बी.ए. प्रथम वर्ष उर्दू ,हिंदी, बी.कॉम. आणि ग्राहक सेवा या शिक्षणक्रमाच्या परीक्षेला अनुपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अंतिम लेखी परीक्षा दिनांक १७ व दि. १८ सप्टेंबर या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत.

मुक्त विद्यापीठाच्या प्रथम वर्ष बी. ए. आणि बी. कॉम. शिक्षणक्रमाच्या उन्हाळी वार्षिक तसेच सत्र परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत. राज्यात काही ठिकाणी अतिवृष्टी, पूर, वादळ, वीजपुरवठा खंडित होणे, नेटवर्क नसणे अशा विविध कारणांमुळे काही विद्यार्थ्यांना परीक्षेला उपस्थित राहता आले नाही. अशा विद्यार्थ्यांसह अन्य वेगवेगळ्या कारणांमुळे परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून ऑनलाईन परीक्षा देण्यासाठी पुन्हा एक संधी उपलब्ध करून देण्यात आली असून, शुक्रवारी (दि. १७) व शनिवार (दि.१८) सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत परीक्षा देता येणार असल्याची माहिती मुक्त विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील यांनी दिली.

Web Title: Absent students re-examine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.