कोविडमुळे अनुपस्थित विद्यार्थ्यांना पुन्हा मिळणार परीक्षेची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2021 11:48 PM2021-06-08T23:48:32+5:302021-06-09T01:11:36+5:30

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या हिवाळी २०२० परीक्षा येत्या १० जूनपासून सुरू होणार आहेत. या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह निघाल्यामुळे परीक्षेस अनुपस्थित राहाव्या लागणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षा घेण्यात येणार आहेत. अशा विद्यार्थ्यांचा अनुपस्थितीत राहिल्याचा प्रयत्न (अटेंम्ट ) मोजण्यात येऊ नयेत, अशा सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी केल्या असून, त्यानुसार विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Absent students will get re-examination opportunity due to Kovid | कोविडमुळे अनुपस्थित विद्यार्थ्यांना पुन्हा मिळणार परीक्षेची संधी

कोविडमुळे अनुपस्थित विद्यार्थ्यांना पुन्हा मिळणार परीक्षेची संधी

googlenewsNext
ठळक मुद्दे वैद्यकीय परीक्षा : आरोग्य विद्यापीठाच्या परीक्षा मंडळ बैठकीत निर्णय

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या हिवाळी २०२० परीक्षा येत्या १० जूनपासून सुरू होणार आहेत. या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह निघाल्यामुळे परीक्षेस अनुपस्थित राहाव्या लागणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षा घेण्यात येणार आहेत. अशा विद्यार्थ्यांचा अनुपस्थितीत राहिल्याचा प्रयत्न (अटेंम्ट ) मोजण्यात येऊ नयेत, अशा सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी केल्या असून, त्यानुसार विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
कोविड १०च्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या वैद्यकीय परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत, या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी दिल्या आहेत. त्या अनुषंगाने प्रभारी कुलगुरू डॉ.नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथे झालेल्या विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, विद्यापीठाच्या हिवाळी-२०२० लेखी परीक्षेस कोविड १९ आजाराचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे अनुपस्थित राहतील, अशा विद्यार्थ्यांची हिवाळी-२०२० लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा झाल्यानंतर, घेण्यात येणाऱ्या विशेष परीक्षेसाठी अनुपस्थित असलेल्यांचा प्रयत्न ग्राह्य धरला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असून, विशेष परीक्षेचा दिनांक यथावकाश जाहीर करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांची आरटीपीसीआर चाचणी विनामूल्य
वैद्यकीय परीक्षेस बसणारे विद्यार्थी परीक्षेचे प्रवेशपत्र घेऊन कोणत्याही शासकीय रुग्णालय, तसेच शासनमान्य कोविड रुग्णालयात स्वतःची आरटीपीसीआर चाचणी विनामूल्य करून घेऊ शकणार आहेत, तसेच जे विद्यार्थी वैद्यकीय महाविद्यालयातील वसतिगृहात राहण्यास इच्छुक आहेत, अशा विद्यार्थ्यांची वसतिगृहात वैयक्तिक अंतर राखून राहण्याची सोय करण्यात यावी, वसतिगृहाच्या मेसमध्ये भोजनाची सोय करण्यात यावी, वसतिगृहाची स्वच्छता व निर्जंतुकीकरण वेळोवेळी करण्यात यावे, तसेच सर्व प्रकारची काळजी घेऊनच वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात याव्यात, असेही वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठाता यांना कळविण्यात आल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Web Title: Absent students will get re-examination opportunity due to Kovid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.