चौथीच्या मुलींशी गैरवर्तन; दोषी शिक्षक बडतर्फ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 01:14 AM2018-06-26T01:14:02+5:302018-06-26T01:14:34+5:30
नाशिक : शाळेतीलच इयत्ता चौथीच्या मुलींशी गैरवर्तन केल्याप्रकरणी दोषी आढळलेल्या शिक्षकावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. २०१६ मध्ये निफाड येथील देवीचा माथा जिल्हा परिषदेच्या शाळेत सदर प्रकार घडला होता. या प्रकरणाची गेल्या दोन वर्षांपासून चौकशी सुरू होती. चौकशी समितीने दिलेल्या अहवालानुनासर दोषी आढळलेल्या शिक्षकावर कारवाई करण्यात आली आहे.

सन २०१६ मध्ये निफाड येथील देवीचा माथा जिल्हा परिषद शाळेत कार्यरत प्राथमिक शिक्षकाने इयत्ता चौथीच्या वर्गातील विद्यार्थिनींशी गैरवर्तन केले होते. या प्रकरणी नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी समितीच्या अहवालात सदर शिक्षक दोषी आढळल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी त्यांना सेवेतून बडतर्फ केले आहे.
निफाड येथील देवीचा माथा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत निंबाजी काकुळते हे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते. २७ सप्टेंबर २०१६ रोजी सदर शिक्षकाने इयत्ता चौथीतील विद्यार्थिनींशी मधल्या सुटीत शालेय आवारात अश्लील वर्तन केले होते, तसेच असमाधानकारक कामकाज, विद्यार्थ्यांना मारहाण करणे अशाप्रकारे त्यांच्यावर दोषारोप लावण्यात आले होते. याबाबत त्यांची गटशिक्षण अधिकाऱ्यांमार्फत खाते चौकशी करण्यात आली होती. त्यांनी याबाबत चौकशी करून काकुळते यांच्यावर ठेवण्यात आलेले आरोप सिद्ध होत असल्याचा अहवाल सादर केला होता. दरम्यान या कारवाईचे परिसरातून स्वागत केले जात आहे.सदर दोषी शिक्षकास महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ चे भाग ४ मधील कलम ७ नुसार बडतर्फीची अंतिम कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र त्यांचा खुलासा परिस्थितीजन्य नसल्याने अमान्य करण्यात आला असून, त्यांना महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियमानुसार सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.