भोकणी येथे वीज कर्मचाऱ्यांना शिवीगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2022 10:52 PM2022-02-05T22:52:47+5:302022-02-05T22:53:22+5:30

सिन्नर : घरगुती वीजजोडणीची थकबाकी असल्याने वीजपुरवठा खंडित करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना ग्राहकाने शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी वावी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. सिन्नर तालुक्यातील भोकणी येथे सदर प्रकार घडला.

Abuse of power workers at Bhokani | भोकणी येथे वीज कर्मचाऱ्यांना शिवीगाळ

भोकणी येथे वीज कर्मचाऱ्यांना शिवीगाळ

Next
ठळक मुद्दे वीज ग्राहक गोरख पवार यांच्याकडे नोव्हेंबर २०२१ पासून घरगुती वीजबिल थकलेले

सिन्नर : घरगुती वीजजोडणीची थकबाकी असल्याने वीजपुरवठा खंडित करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना ग्राहकाने शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी वावी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. सिन्नर तालुक्यातील भोकणी येथे सदर प्रकार घडला.

देवपूर वीज वितरण उपकेंद्राच्या कार्यालयांतर्गत तंत्रज्ञ असलेले योगेश्वर थोरात हे सहायक अभियंता वैभव पवार यांच्या आदेशाने गणेश दौड व रामदास शिरसाठ यांच्यासमवेत भोकणी येथे थकीत वीजबिलांच्या वसुलीसाठी गेले होते. वीज ग्राहक गोरख पवार यांच्याकडे नोव्हेंबर २०२१ पासून घरगुती वीजबिल थकलेले असल्याने व वारंवार मागणी करूनही ते भरणा करत नसल्याने थोरात यांनी त्यांच्या घराची वीजजोडणी खंडित करण्याची कारवाई सुरू केली. पवार यांनी अडथळा आणत तुमच्याकडे वीजपुरवठा खंडित करण्याचा लेखी आदेश आहे काय, अशी विचारणा केली. तसेच त्यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व दमदाटी केल्याची व सरकारी कामात अडथळा आणल्याची फिर्याद थोरात यांनी वावी पोलिसांत दिली. पोलिसांनी संबंधित वीजग्राहकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हवालदार सतीश बैरागी अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Abuse of power workers at Bhokani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.