निरीक्षकाविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 12:00 AM2017-09-08T00:00:22+5:302017-09-08T00:09:08+5:30
मंदिराच्या पुजाºयावर बेकायदेशीर कारवाई केल्याचा ठपका न्यायालयाने ठेवल्यानंतर पुजारी यांनी पोलीस निरीक्षक अनंत तारगे, स्थानिक गुन्हा शाखेचे किशोर नवले यांच्याविरोधात न्यायालयात १० लाख रु पयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.
वणी : मंदिराच्या पुजाºयावर बेकायदेशीर कारवाई केल्याचा ठपका न्यायालयाने ठेवल्यानंतर पुजारी यांनी पोलीस निरीक्षक अनंत तारगे, स्थानिक गुन्हा शाखेचे किशोर नवले यांच्याविरोधात न्यायालयात १० लाख रु पयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.
जगदंबा देवी मंदिर पुजारी सुधीर दवणे यांचे बंधु महारूद्र हनुमान सेवा समीती न्यासाचे सदस्य आहेत. न्यासाच्या नोंदणी क्र मांकाचा गैरवापर करुन फसवणूक केली म्हणून सतीश जाधव व अन्य ७ जणाविरोधात गुन्हा दाखल आहे. दि. १९ आॅक्टोबर २०१६ रोजी दवणे जात असताना जाधव यांनी त्यांना न्यायालयातील केस मागे घ्यायला सांगून धमकावले. याबाबत पोलीसात तक्रार झाली. परस्पराविरोधी तक्रारीनंतर दि. ४ नोव्हेंबर रोजी पोलिस निरिक्षक किशोर नवले यांनी सुधीर दवणे यांना नोटिस पाठवत हजर राहण्याचे फर्मान सोडले. पोलीस निरिक्षक अनंत तारगे यांनी याबाबतचा प्रस्ताव कारवाईसाठी स्थानिक गुन्हा शाखेकडे पाठविल्याचीही बाब पुढे आली. दवणे यानी न्या. आर. आर. वैष्णव यांच्या न्यायालयात या नोटिसला आव्हान देत आवश्यक पुरावे सादर केल्यानंतर न्यायालयाने पोलिस निरिक्षक किशोर नवले व अनंत तारगे यांची कारवाई चुकीची ठरवत दवणे यांच्या बाजुने निकाल दिला. या निकाला आधारे दवणे यांनी पोलीस निरिक्षक किशोर नवले, अनंत तारगे यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला असुन सतिष जाधव यांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे.