शिक्षणासाठी वर्षभर देणार शैक्षणिक साहित्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 05:40 PM2019-06-29T17:40:28+5:302019-06-29T17:40:39+5:30
सिन्नर : तालुक्यातील पूर्व भागाच्या सरहद्दीवर असलेल्या सायाळेच्या गोरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या वर्षभराच्या शैक्षणिक साहित्याच्या खर्चाचा भार गावातीलच गोरे कुटुंबीयांनी उचलला आहे. सेवानिवृत्त प्राध्यापक अशोक गोरे यांनी वडिलांच्या स्मरणार्थ हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला असून शिक्षणासाठी परवड असणाºया विद्यार्थ्यांना यामुळे मोठा आधार मिळणार आहे.

गेल्यावर्षीपासून गोरेवाडीच्या शाळेत अनेक विद्यार्थी पूरक उपक्रम राबवले जात आहेत. तालुक्यातील सुरेगाव म्हणून खेडकर यांच्या प्रयत्नातून शाळेला पहिली आयएसओ शाळा म्हणून मानांकन मिळवून देणारे उपक्रमशिल शिक्षक उमेशचंद्र खेडकर हे मुख्याध्यापक म्हणून बदलून आल्यावर शाळेचा जणू चेहरा मोहरा बदलला आहे. तालुक्यातील पहिली डिजटल व टॅब युक्त शाळा म्हणून लोकसहभागातून या शाळेला नवा बहुमान मिळाला. तेव्हापासून शाळेबद्दल स्थानिक रहिवासी देखील मदतीला तत्पर राहत आहेत. विद्यार्थ्यांना अध्यापनात अडचणी येऊ नयेत यासाठी पालक देखील सजग राहत आहेत.