राजापूर परिसरात शेती मशागतीच्या कामांना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 08:56 PM2020-06-06T20:56:19+5:302020-06-07T00:47:12+5:30
राजापूर परिसरात रोहिणी नक्षत्राच्या हजेरीने शेती मशागतीच्या कामांना वेग आला आहे. रिम झिम पाऊस झाल्याने शेतकरीवर्ग खरीप हंगामासाठी मशागतीच्या कामांत व्यस्त असल्याचे चित्र परिसरात पाहायला मिळत आहे.
राजापूर : परिसरात रोहिणी नक्षत्राच्या हजेरीने शेती मशागतीच्या कामांना वेग आला आहे. रिम झिम पाऊस झाल्याने शेतकरीवर्ग खरीप हंगामासाठी मशागतीच्या कामांत व्यस्त असल्याचे चित्र परिसरात पाहायला मिळत आहे. ट्रॅक्टर व बैलाच्या साहाय्याने फनाटी करणे, ढेकळे फोडणे, वखर, शेणखत टाकणे आदी कामात शेतकरी वर्ग व्यस्त आहे. खरीप पेरणीसाठी शेतकरीवर्ग बी-बियाणे खरेदी करीत आहे. ७ जूनपासून मृग नक्षत्र सुरू होत असल्याने दमदार पावसाची शेतकरीवर्गाला अपेक्षा आहे. परिसरात काही शेतकऱ्यांनी शेततळ्यातील शिल्लक पाण्यातून ठिबक सिंचनाचा वापर करीत टमाटा लागवड सुरू केली आहे.