खडकी परिसरात शेतीच्या पेरणी कामांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:08 PM2021-05-30T16:08:21+5:302021-05-30T16:08:54+5:30

खडकी-पावसाळा ऋतु पूर्वीचा पावसाला सुरुवात झाल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे. रोहिणी नक्षत्र सुरू झाले आहे. रोहिणी नक्षत्रात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना आपल्या अपेक्षेप्रमाणे पिके घेण्यासाठी जमीन तयार करावी यासाठी सुरुवात केली केली आहे.

Accelerate agricultural sowing in rocky areas | खडकी परिसरात शेतीच्या पेरणी कामांना वेग

खडकी परिसरात शेतीच्या पेरणी कामांना वेग

googlenewsNext
ठळक मुद्देकांदा लागवडीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होणार

खडकी-पावसाळा ऋतु पूर्वीचा पावसाला सुरुवात झाल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे. रोहिणी नक्षत्र सुरू झाले आहे. रोहिणी नक्षत्रात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना आपल्या अपेक्षेप्रमाणे पिके घेण्यासाठी जमीन तयार करावी यासाठी सुरुवात केली केली आहे.

मालेगाव ग्रामीण परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. माळमाथ्यावर शेतकऱ्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली आहे. कापूस मका बाजरी भुईमूग लागवड केल्यास उत्पादनात वाढ होणार आहे. कांदा लागवडीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. कारण या वर्षी चांगले उत्पादन व बाजारभावही टिकून राहिल्याने शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा झाला आहे .

खरीप हंगामात शेतकऱ्यांना पावसापूर्वी मक्याच्या पिकासाठी शेतात बेलेनांगरणी सुरुवात केली आहे. मजुरांची टंचाई भासत असल्याने शेतकऱ्यांनी शाळेत शिकणाऱ्या आपल्या मुलांना काडीकचरा वेचून बांधावरील झाडे झुडपे साफ करणे आदी कामे सुरू आहेत. सद्यस्थितीत शेतकऱ्यांकडे बैलजोडी नसल्याने ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने कामे उरकून घेत आहेत.

शेतातील नांगरणी बेले नांगरणी करणे आदी कामे ही शेती ट्रॅक्टर यंत्राच्या साहाय्यानेच सुरू केली आहे. कारण बैलांच्या किमतीतही वाढ झाल्याने शेतकऱ्यांना परवडणारे नसल्याने ट्रॅक्टर यंत्रमार्फत पैसे देऊनच शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी तयार करण्यास सुरुवात केली आहे. बैल खरेदी बाजार खरेदी किंवा विक्री बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या घरोघरी जाऊन बैलांची खरेदी करणे सुरू झाले आहे. ेतकर्‍यांनी पेरणी पूर्वी रासायनिक खतांचे दर वाढण्याची भीती असल्याने आर्थिक नियोजन बिघडणार आहे.

त्याचप्रमाणे कृषी निविष्ठा दुकानदाराकडे खरेदीसाठी लोकांनी आपल्या आर्थिक नियोजनाची व्यवस्था सुरु केली आहे. बँकेचे पिक कर्ज किंवा खाजगी सावकाराकडून पैसे घेऊन आपल्या शेतीच्या बियाणे मजुरी यासाठी आर्थिक नियोजन सुरू केले आहे. शेतकऱ्यांनी आपल्या गुरांच्या साह्याने मिळालेले असेल शेणखत भरून ट्रॅक्टर ट्रॉली च्या साह्याने शेतात टाकून हे मिश्रण करण्याच्या कामांनाही वेग आला आहे सध्या स्थिती ग्रामीण भागात शेतीच्या कामांना वेग आल्याने आपल्या कामामध्ये शेतकरी व्यक्त झाला आहे.

Web Title: Accelerate agricultural sowing in rocky areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.