शहरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:16 AM2021-02-13T04:16:34+5:302021-02-13T04:16:34+5:30
नाशिक- शहरात कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न सुरू असून आता आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पाठोपाठ पोलीस आणि महापालिकेतील जे फ्रंट ...
नाशिक- शहरात कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न सुरू असून आता आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पाठोपाठ पोलीस आणि महापालिकेतील जे फ्रंट वॉरियर्स म्हणून मानले जातात त्यांना लसीकरण करण्यात येत आहे. पाच दिवसात ८ हजार ८ हजार ३०६ कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले आहेत.
कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी नाशिक शहरात चांगला प्रतिसाद लाभत आहे. नाशिक शहरात जिल्हा शासकीय रुग्णालयाबरोबरच नाशिक महापालिकेच्या बिटको रुग्णालय व न्यू बिटको रुग्णालय, इंदिरा गांधी रुग्णालय तसेच काही खासगी रुग्णालयात चाचणी करण्यात येत आहे. सुरुवातीला आरोग्य कर्मचाऱ्यांसाठीच चाचणी करण्यात येत हेाती. मात्र नंतर आता दुसऱ्या टप्प्यात पाेलीस आणि महापालिकेतील फ्रंट वॉरियर्स मानल्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत आहे. पोलीस आयुक्तालयाने सहाशे कर्मचाऱ्यांची यादी महापालिकेकडे पाठवली हेाती. त्याच प्रमाणे महापालिका कर्मचाऱ्यांची देखील यादी करून त्यांचे लसीकरण करण्यात येत आहे. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
महापालिकेने काही खासगी रुग्णालयातील दाेनशे ते तीनशे कर्मचारी असेल तर थेट रुग्णालयात लसीकरण करण्याची सुविधा महापालिकेने दिले आहे. त्यानुसार आयएमए, एचसीजी रुग्णालय, सह्याद्री अशा काही रुग्णालयांबरोबरच सातपूर येथील कामगार विमा रुग्णालयात देखील लस देण्यात आली आहेत. ही लस महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आल्याचे महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापुसाहेब नागरगोजे यांनी सांगितले.
इन्फो...
आता डॉक्टरांची घाई पण लिंक बंद
नाशिक शहरातील कोरोना योध्दे म्हणून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांबरोबरच खासगी रुग्णालयातील डॉक्टर आणि अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले हेाते. मात्र तीन महिन्यांपासून सर्व डॉक्टरांकडे यादी मागूनही ती दिली जात नव्हती. पण आता अनेक डॉक्टर आणि कर्मचारी लस घेण्यास उत्सुक आहेत परंतु आता शासनाच्या ॲपमधील लिंकच खुली होत नाही. यासंदर्भात महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत देखील पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती डॉ. नागरगोजे यांनी दिली.