नाशिक परिसरात खरीपाच्या तयारीला वेग ; काही ठिकाणी पेरण्यांची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 07:00 PM2020-06-20T19:00:20+5:302020-06-20T19:03:34+5:30
नाशिक शहर परिसरात झालेल्या जोरदार पावसानंतर उघडीप मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीची मशागत आणि पेरणीची कामे वेगाने सुरू केली आहे. हवामान खात्याने यंदा चांगल्या पावसाची शक्यता वर्तवल्याने शेतकरीवर्ग खरिपाच्या तयारीमध्ये गुंतला आहे.
नाशिक : शहर परिसरातील गावांतील शेतकऱ्यांकडून खरीपाच्या तयारीला वेग देण्यात आला आहे. शहर परिसरात सोमवारी(दि.14) झालेल्या जोरदार पावसानंतर उघडीप मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीची मशागत आणि पेरणीची कामे वेगाने सुरू केली असून आगामी काळाळा समाधानकारक मान्सून येण्याची आशा शेतकऱ्यांना लागली आहे.
हवामान खात्याने यंदा चांगल्या पावसाची शक्यता वर्तवल्याने शेतकरीवर्ग खरिपाच्या तयारीमध्ये गुंतला आहे. नाशिक तालुक्यात बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे बागायती पिकांना मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची पसंती आहे. एकूणच मान्सून पूर्व पावसाचे आगमन झाल्याने शेतकर्यांनी खरिपाच्या तयारीला वेग दिला आहे. कोरोनाच्या महामारीपासून बचाव होण्याकरिता कृषी विभागाने थेट खते व बियाणे शेतक यांच्या बांधावर पोहोचवला पाहिजे अशी मागणी शेतक यांकडून करण्यात येत आहे. देशात सर्वत्र कोरोनामुळे गेल्या दोन ते अडीच महिन्यापासून सर्वत्र लॉकडाऊन व संचारबंदी सुरू होती. या दरम्यान अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पालेभाज्य व फळभाज्यांचे पिक संपुष्टात आले असून शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. कोरोना महामारीमुळे नागरिक आपापल्या गावी घरी बसून आहेत. सद्यःस्थितीत खरीप हंगामाला सुरूवात झालेली आहे. शेतकऱ्यांनी नांगरणी, वखरणी केली असून, नाशिक शहर परिसरात समाधान कारक पाऊस झाल्याने काही भागात पेरणीलाही सुरूवात झाली
आहे.