वटार परिसरात कांदा लागवडीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:36 AM2020-12-04T04:36:49+5:302020-12-04T04:36:49+5:30

बागलाणच्या पश्चिमपट्ट्यातील वटार, चौंधाणे, वीरगाव, वनोली, डोंगरेज, कंधाणे, विंचुरे आदी गावांमध्ये कांदा लागवडीने जोर धरला आहे. दरवर्षाप्रमाणे यंदाही कापलेल्या ...

Accelerate onion cultivation in Watar area | वटार परिसरात कांदा लागवडीला वेग

वटार परिसरात कांदा लागवडीला वेग

Next

बागलाणच्या पश्चिमपट्ट्यातील वटार, चौंधाणे, वीरगाव, वनोली, डोंगरेज, कंधाणे, विंचुरे आदी गावांमध्ये कांदा लागवडीने जोर धरला आहे. दरवर्षाप्रमाणे यंदाही कापलेल्या निसर्गाशी दोन हात करत बळीराजा शेतात राबताना दिसत आहे.

जिल्ह्यातील आदिवासी भागातील मजूर वर्ग ऊसतोडणीसाठी बाहेरगावी गेला असल्याने मोठ्या प्रमाणात मंजूर टंचाई निर्माण झाली असून, प्रत्येक गावात इतर भागातून मजूर आणावे लागत आहे. तेही रोजंदारीवर न येता कंत्राट पद्धतीने काम करत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, मजुरीचे दरही वाढले असून, कांदा लागवडीसाठी २५० ते ३०० रुपये रोज मजुरांना द्यावा लागतो. त्यामुळेच बियाणे, खते आदीमुळे कांदा उत्पादनासाठी खर्चातही वाढ झाली आहे.

गेल्यावर्षी व यंदा कांद्याला चांगला बाजारभाव असल्यामुळे इतर पिकांपेक्षा चार महिन्यांच्या कांदा पिकाची लागवडीसाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी रोपे, बियाणे मिळेल त्या दराने विकत घेऊन कांदा लागवडीवर भर दिला आहे; परंतु शेतकऱ्यांना अधूनमधून पडणाऱ्या ढगाळ हवामानामुळे औषध फवारणी मोठ्या प्रमाणात कराव्या लागतात. त्याचबरोबर बाजार मिळतो की नाही या विचाराने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागतो. ढगाळ हवामानामुळे कांद्यावर मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. सध्या एक एकर लागवडीसाठी मजूरवर्ग १३ ते १५ हजार रुपये मजुरी घेतो. एक एकरासाठी यंदा बियाणांचे बाजारभाव बघता एक लाख रुपयांच्या आसपास खर्च कांदा काढणीपर्यंत होणार आहे. एवढा खर्च करून पीक निघेल आणि बाजारभाव मिळेल याची शाश्वती नसतानाही शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा लागवडीकडे वळला आहे.

चौकट...

यंदा १५ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार कांदा लागवड

यंदा अवकाळी पाऊस व खराब हवामानामुळे ७० टक्के कांदा रोपे खराब झाल्यामुळे शेतकऱ्यांनी एक-दोन नाही तर चार-पाच वेळा कांद्याची बियाणे टाकली, तसेच दर आठवड्याला फवारणी केली. मात्र रोपे चांगली नसल्यामुळे कांदा लागवडीत घट होणार असून, सध्या कांद्याच्या रोपांना सोन्याचा भाव मिळत आहे. तरीही रोपे मिळत नाहीत. आहे तेवढ्यात लागवड करत असून, यंदा अजूनसुद्धा शेतकरी बियाणे टाकत आहेत. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत रोपे टाकले जातील, त्यामुळे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कांदा लागवडी सुरूच राहतील असे चित्र सध्या तरी दिसत आहे.

चौकट...

बियाणांमुळे उत्पादन खर्चात दुप्पट वाढ

परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात रोपवाटिकांचे नुकसान झाले. परिमाणी शेतकऱ्यांना चार ते पाच वेळेस रोप टाकावी लागली. यामुळे बाजारत कांदा बियाणांचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून कधी एकले नाही अशा सामान्य कंपनीचे देखील बियाणे बाजारात ५ ते ६ हजार रुपये प्रतिकिलोने शेतकऱ्यांनी खरेदी केल्यामुळे यंदा शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बियाण्यामुळे दुप्पट वाढ होणार आहे.

प्रतिक्रिया...

मागील काही महिन्यापासून कांद्याचे बाजारभाव विचारात घेता. शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल वाढला आहे. परतीच्या पावसामुळे रब्बी उन्हाळी कांदा लागवडीच्या रोपवाटिकावर विपरीत परिमाण झाल्याने कांदा बियाणांची मागणी वाढली आहे. शेतकऱ्यांकडील पाण्याची उपलब्धता लक्षात घेता मागील वर्षाच्या तुलनेत कांदा लागवडीच्या क्षेत्रात फारसी घट होणार नाही. रोपे लावतांना शेतकऱ्यानी एम ४५, वीस ग्राम, बाविस्टीन १० ग्राम, क्लोरोपार्रिफॉस् २० मीली. दहा लिटर पाण्यामध्ये पंधरा मिनिटं कांद्याची रोपे बुडून ठेवायची व वाळवून ती लागवड करायची असे कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे.

- सुधाकर पवार, तालुका कृषी अधिकरी, सटाणा.

यंदा परतीच्या पावसामुळे रोपांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे त्यातच ५ ते ६ हजार रुपये किलो भावाने शेतकऱ्यांनी बियाणे विकत घेतले. त्याला दर आठवड्याला फवारणी त्यामुळे यंदा कांद्याच्या उत्पादन खर्चात दुप्पट वाढ झाली आहे. पैसे देऊन मजूर मिळत नाही, मजुरीचे दामही दुप्पट वाढले आहेत. त्यामुळे शेती कसने अवघड झाली आहे.

- संतोष बागुल, युवा कांदा उत्पादक शेतकरी.

(फोटो ०२ वटार)

वटार येथे कांदा लागवड करताना मजुर.

===Photopath===

021220\02nsk_22_02122020_13.jpg

===Caption===

वटार येथे कांदा लागवड करताना मजुर.

Web Title: Accelerate onion cultivation in Watar area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.