त्र्यंबकेश्वरला पेरणीच्या कामाला वेग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2021 11:04 PM2021-06-08T23:04:38+5:302021-06-09T01:10:09+5:30
त्र्यंबकेश्वर : शहरासह तालुक्यात पेरणीच्या कामांना वेग आला आहे. यापूर्वी ह्यतौक्तेह्ण वादळापासून महाराष्ट्रात पाऊस पडत आहे. त्यानंतर, ह्ययासह्ण वादळाचे आगमन झाले. त्यामुळे पावसाचे दररोज दुपारी आगमन होत आहे. या पावसात बऱ्याच लोकांनी पेरण्या केल्या, पण काही शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रातच पेरण्या करणे पसंत केले

. या वर्षी कृषी विभागाने २५ हजार हेक्टरवर खरिपाच्या पिकाच्या लागवडीचे उद्दिष्ट केले आहे, तर सध्या सुमारे १२ हजार हेक्टर वर भाताची पेरणी सुरू केली आहे. छोटे शेतकरी बैलांच्या नांगराने भात पेरणी करत असून, सधन शेतकरी यांत्रिक अवजाराने ट्रॅक्टरच्या साहाय्याने कल्टिव्हेटर लावून पेरणी करत आहेत.
त्र्यंबकेश्वर परिसरात पर्यटकांची गर्दी
त्र्यंबकेश्वर : निर्बंध शिथिल होताच, तालुक्यात हिरवाई पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे. पहिने परिसरात पर्यटकांची पिकनिकसाठी गर्दी होत आहे. पावसाळ्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील निसर्गाचे आकर्षण असलेल्या अंबोली घाट, दुगारवाडी धबधबा वाघेरा, हरसूल घाट पर्यटकांना फुलला आहे. अनेक नागरिक सुट्ट्यांचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात. सुट्ट्यांच्या दिवशी मागील काही वर्षांपासून जशी वाहनांची झडती होत असते, तशी झडती या चार महिन्यांतही करावी, अशी मागणी होत आहे.