उजनीत कोरोना चाचणीसह लसीकरणाला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:12 AM2021-04-26T04:12:40+5:302021-04-26T04:12:40+5:30
गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, तालुका वैद्यकीय अधिकारी मोहन बच्छाव, सरपंच भारती वाघ, उपसरपंच बाळासाहेब सापनर, सदस्य प्रवीण जगताप यांनी ...
गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, तालुका वैद्यकीय अधिकारी मोहन बच्छाव, सरपंच भारती वाघ, उपसरपंच बाळासाहेब सापनर, सदस्य प्रवीण जगताप यांनी यंत्रणा सतर्क करीत कोरोनाचा अधिक प्रादुर्भाव होऊ नयेत, यासाठी काळजी घेतली आहे. मानवीय चुकांमुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. परंतु कोरोना काळात झालेल्या मानवी चुका किती घातक आहेत, याचा प्रत्यक्ष अनुभव उजनीकर ग्रामस्थ घेत आहेत. शासकीय सूचनांचे पालन न करणे तसेच आम्हाला काय झालंय ? आमची तर प्रतिकारशक्ती उच्च दर्जाची आहे. आम्ही मळ्यात राहतो, इकडे कोण येत नाही, असे बोलून स्वैर वागण्याचे प्रमाण अधिक होते. परंतु अशा वागण्याचे दुष्परिणाम ध्यानात आल्याने ग्रामस्थ भानावर आल्याने काटेकोर नियम पाळतांना दिसत आहेत. कधी नव्हे एवढा मास्क, सामाजिक अंतर, सॅनिटायझेशन यांचा वापर होत आहे. याच वेळेवर प्रशासन व ग्रामपंचायत पदाधिकारी कोरोना निर्मूलनासाठी झटत आहेत. पालकमंत्री, आमदार, खासदार, माजी आमदार यांना व्यथा सांगत ताबडतोबीने लसीकरण शिबिर राबवण्यात आले. यानंतर लवकरच लसीकरण कॅम्प व्हावा, यास्तव सरपंच भारती वाघ, उपसरंपच बाळू सापनर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा पदाधिकारी प्रवीण जगताप यांनी पत्रव्यवहार केला आहे. तसेच उपसरपंच सापनर यांनी सक्रीय सहभाग घेत रॅपिड अँटिजेन टेस्ट कॅम्प घडवून आणला आहे. यावेळी जे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, त्यांना गृह विलगीकरणाचा सल्ला देत औषधोपचार करण्यात आले. ज्यांना पुढील उपचारांची गरज आहे, त्यांना तत्काळ सिन्नर येथील कोविड सेंटरशी संपर्क करुन ॲडमिट होण्याचा सल्ला दिला गेला. मास्क वापरा, घरीच रहा, सुरक्षित रहा, असा सल्लाही ग्रामपंचायत प्रशासन ग्रामस्थांना देत आहे. याकामी ग्रामसेवक उमाजी भरसट, अनिल जाधव, दीपक जगताप, श्रावण पवार या कर्मचाऱ्यांनी गावात लवकरच ग्रामपंचायतीच्या वतीने सॅनिटायझेशन व जनजागृती करण्यात येणार असल्याचे सांगितले. ग्रामस्थ, व्यावसायिक, दूध संकलन केंद्र चालक आदिंनी सहकार्य करावे, असे म्हटले आहे.
फोटो ओळीः सिन्नर तालुक्यातील उजनी येथे ४५ वर्षांच्या पुढील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. त्यावेळी उपस्थित गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, तालुका आरोग्य अधिकारी मोहन बच्छाव, नीलेश भुजाळ, सरपंच भारती वाघ, उपसरपंच बाळासाहेब सापनर, सदस्य प्रवीण जगताप, चांगदेव साबळे, बापू पोलगर, बबन भडांगे, दीपक जगताप, अनिल जाधव, श्रावण पवार, आशा कार्यकर्ती नयना सापनर आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.
===Photopath===
250421\25nsk_4_25042021_13.jpg
===Caption===
उजनी येथे लसीकरण