संत निवृत्तीनाथ मंदीराच्या काळ्या पाषाणातील कामाला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 01:41 PM2019-12-11T13:41:04+5:302019-12-11T13:41:39+5:30
त्र्यंबकेश्वर : येथील श्री संतश्रेष्ठ सदगुरु निवृत्तीनाथ महाराज यांच्या संजीवन समाधी मंदीराचे काळ्या पाषाणात होणाऱ्या कामाला वेग आला असून आकर्षक शिल्पकला सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
त्र्यंबकेश्वर : येथील श्री संतश्रेष्ठ सदगुरु निवृत्तीनाथ महाराज यांच्या संजीवन समाधी मंदीराचे काळ्या पाषाणात होणाऱ्या कामाला वेग आला असून आकर्षक शिल्पकला सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
सध्या हे काम पनवेल येथील तिडके कॉन्ट्रक्टर करीत असुन अत्यंत सुरेख व शिल्पकलेचा अद्वितीय नमुना असे समाधी मंदीर सध्या कळसाकडे आकार घेत आहे. आतापर्यंत झालेले काम अत्यंत सुंदर झाले आहे. या संदर्भात संस्थानचे अध्यक्ष पवनकुमार भुतडा म्हणाले, मंदीराचे संपूर्ण काम काळ्या पाषाणाचे असुन पाषाणावर होणारी शिल्पकलेचे काम रेखीव होत आहे. संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेपर्यंत काम पुर्ण होणार नसल्याने मंदीराचे काम अपुर्णावस्थेत राहील, असे विश्वस्तांनी सांगितले.
साधारणपणे समाधी मंदीराचे काम फेब्रुवारी अखेर पुर्ण होईल अशी अपेक्षा अध्यक्ष भुतडा यांनी व्यक्त केली. संपुर्ण समाधी मंदीराचा जीर्णोध्दार मंदीर काळ्या पाषाणातच व्हावे असा आग्रह संस्थानचे भुतपुर्व अध्यक्ष विद्यमान
ज्येष्ठ विश्वस्त त्र्यंबकराव गायकवाड यांच्या कार्यकाळात एकमताने घेण्यात आला होता. त्यांच्याच कार्यकाळात कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. मंदीर पाषणाच्या कामासाठी सरकारने २२ कोटी रूपये देण्याचे आदेश दिलेले आहेत. यासाठी लवकरच संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानचे विश्वस्त शिष्टमंडळ घेउन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी जाणार असल्याचे समजते. याशिवाय केंद्र शासना कडुन तीन वर्षांपुर्वी प्रसाद योजना कार्यान्वित झाली. संपुर्ण भारतातुन फक्त आठच तिर्थस्थळे, ज्यांचा विकास पर्यटनाच्या दृष्टीने देखील होउ शकेल अशी. त्यात संपुर्ण महाराष्ट्रातुन केवळ त्र्यंबकेश्वरसाठी प्रसाद योजना मंजुर झाली आहे.