घरगुती बैल तयार करण्याच्या कामाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:15 AM2021-09-03T04:15:02+5:302021-09-03T04:15:02+5:30

नगरसुल : येवला तालुक्याच्या ग्रामीण भागात पोळ्यासाठी घरगुती बैल तयार करण्याच्या कामाला वेग आला आहे. नगरसुल येथील ज्ञानेश्वर चांगदेव ...

Accelerate the work of making domestic bulls | घरगुती बैल तयार करण्याच्या कामाला वेग

घरगुती बैल तयार करण्याच्या कामाला वेग

Next

नगरसुल : येवला तालुक्याच्या ग्रामीण भागात पोळ्यासाठी घरगुती बैल तयार करण्याच्या कामाला वेग आला आहे.

नगरसुल येथील ज्ञानेश्वर चांगदेव सोनवणे यांनी पिढीजात व्यवसाय सांभाळत कोरोना काळात घरी बसून वारुळाच्या मातीपासून बैल बनविले. त्यांना धर्मपती प्रतिभा, थोरला मुलगा व लहान मुलगा ओमकार यांनी साथ दिली. पिढीजात व्यवसाय असल्याने वडिलांच्या निधनानंतर आईने हा व्यवसाय खंडित होऊ न देता मडकी, तवली, रांजण, औलाच्या चुली, साधी चूल, नवरात्रात घट, अक्षय्यतृतीयेसाठी लागणारी करा केळी, तर संक्रांतीला लागणारी बोळके, दिवाळीच्या पणत्या, यांसह गणपती मूर्ती व ग्रामीण भागातील बळीराजाचा जिव्हाळ्याचा सण म्हणजे पोळा. हा सण साजरा करतांना शेतकरी आपल्या शेतात काबाडकष्ट करणाऱ्या सर्जा राजा यांना वारुळाच्या मातीच्या बैलांना प्राधान्य देऊन ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंब पोळ्याचे पूजन करतात. पण सध्या ग्रामीण भागात मातीच्या बैलासोबत प्लास्टर ऑफ परिरसच्या बैलांना नोकरदार, व्यावसायिक मागणी करत असल्याने त्याही मोठ्या प्रमाणात करीत आहेत.

(०२ नगरसुल)

020921\02nsk_20_02092021_13.jpg

०२ नगरसुल

Web Title: Accelerate the work of making domestic bulls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.