इगतपुरीच्या पूर्व भागात मशागतीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 12:11 AM2020-06-01T00:11:56+5:302020-06-01T00:13:15+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाउन असले तरी इगतपुरी तालुक्यातील सह्याद्री पर्वतरांगांच्या दुर्गम आदिवासी भागातील शेतकरी मात्र कोरोनावर मात करीत खरीपपूर्व मशागतीचे कामे करण्यात व्यस्त असल्याचे चित्र टाकेद परिसरात दिसत आहे.

Acceleration of cultivation in the eastern part of Igatpuri | इगतपुरीच्या पूर्व भागात मशागतीला वेग

बैलजोडीच्या साह्याने भात राबभाजणी केलेल्या शेताला नांगरणीची पलटी देताना आंबेवाडी येथील शेतकरी सोमनाथ ठवळे. तर दुसऱ्या छायाचित्रात राबभाजणी, बैलांसाठी पेंढा, वैरण साठवणूक करताना शेतकरी.

Next
ठळक मुद्देतयारी खरिपाची : साठवणुकीसाठी बळीराजाची कसरत

नांदूरवैद्य : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाउन असले तरी इगतपुरी तालुक्यातील सह्याद्री पर्वतरांगांच्या दुर्गम आदिवासी भागातील शेतकरी मात्र कोरोनावर मात करीत खरीपपूर्व मशागतीचे कामे करण्यात व्यस्त असल्याचे चित्र टाकेद परिसरात दिसत आहे.
इगतपुरीच्या पूर्व भागातील नगर-नाशिक या दोन जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असलेल्या कळसूबाई शिखराच्या पायथा ते किल्ले अदन, मदन, अलंग-कुलंग तसेच विश्रामगड- पट्टा किल्ला, म्हैसवळण घाट, चौराई ,वनदेव, तांब कडा, आदिवासी
क्र ांतिकारक वीर राघोजी भांगरे यांच्या सोनोशी येथील दºयातील बाडगीची माची, वाघाची गडद या दुर्गम डोंगररांगांच्या पायथ्याशी असलेल्या आंबेवाडी, मांजरगाव, खडकेद, इंदोरे, वासाळी, बारशिंगवे, सोनोशी, मायदरा, धानोशी, चौराईवाडी, वनदेव टेकडी, फळविहीर वाडी, अडसरे, टाकेद परिसरातील खेड, अधरवड, धामणीची वाडी, पिंपळगाव मोर आदी परिसरात शेतकामांना वेग आला
आहे.
ग्रामीण भागातील शेतमजूर वैरण काडी, पेंढा, करडी गवत, लाकूडफाटा, बी-बियाणे, खते याव्यतिरिक्त भात पिकासाठी राबभाजणीच्या कामास शेतातील गवत काढणी, नांगरणी, बांधावरील पालापाचोळा पेटवून देणे आदी कामे करताना दिसत आहे.
आदिवासी भागात शेतकऱ्यांना राबभाजणीसाठी झाडांच्या फांद्याची गरज भासते. मात्र, अशा कामांसाठी येथील शेतकरी वृक्षांची कत्तल करीत नाहीत. उंच वाढलेल्या मोठ्या झाडांच्या निरु पयोगी फांद्या मुख्य झाडाला कोणत्याही प्रकारची इजा न पोहचवता छाटून घेतल्या जातात. त्यामध्ये गवत, खत, बांधावरील गवतकाडी व इतर पालापाचोळा टाकून जाळून टाकला जातो. जमीन भाजली जाते. भाजलेली जमीन ही भात, खुरासनी या पिकांच्या रोपांसाठी उपयुक्त ठरते. राबभाजणी अंतिम टप्प्यात आली आहे. लॉकडाउनचा परिणाम प्रामुख्याने शहरी भागात जास्त प्रमाणावर दिसून येत आहे. एकीकडे मजूरटंचाई असली, तरी शेतकरी आपल्या कुटुंबातील सदस्यांसह सर्जा-राज्या बैलजोडीसोबत शेतकामे पूर्ण करण्यावर भर देत आहे. शेतकामांना वेग आल्याने परिसरातील शेतमजुरांना रोजगार मिळला आहे.

दरवर्षी उन्हाळ्यात आंबे, जांभळे, आवळे, करवंदे, सागवानाची पाने आदी रानमेवा विकून थोड;फार पैसे मिळायचे. मात्र, यंदा कोरोनाच्या संचारबंदीत मोठे नुकसान झाले आहे. रानमेव्याच्या मोबदल्यात कांदे, गहू मिळायचे; पण यंदा ते मिळाले नाही. लवकरच सर्व सुरळीत होण्याची अपेक्षा आहे. पाऊस येण्याअगोदर शेतातील कामे आटोपण्याचा आमचा
प्रयत्न आहे.
- भागू लाहोरे, खडकेद

पाऊस पडायच्या आत डोंगरदºयातील- माळरानावर असलेल्या शेतावरील जेथुडीसाठी फोडून ठेवलेला लाकूडफाटा, गुरांसाठी ठेवलेली वैरणकाडी, पेंढा सुरक्षित ठिकाणी ठेवणे, राबभाजणी, राबाच्या शेतात नांगरणी, वखरणी करणे या कामांच्या पूर्वतयारीची लगबग सुरू आहे. यंदा भरघोस उत्पन्न घेऊन आर्थिक नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न आहे.
- सोमनाथ ठवळे, आंबेवाडी

Web Title: Acceleration of cultivation in the eastern part of Igatpuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.