राजापूर परिसरात मका सोंगणीला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 05:19 PM2020-10-05T17:19:08+5:302020-10-05T17:19:21+5:30
राजापूर : परिसरात सध्या पावसाने उघडीप दिल्याने सध्या शेतकऱ्यांच्या खरीपाच्या मका सोंगणीला सूरवात झाली आहे. मका सोंगणी मजुरीचा खर्च एकरी सहा ते सात हजार रु पये आहे. रोजंदारी ८०० रु पये जोडी असा मका, सोयाबीन, बाजरी, सोंगणीचा मजुरीचा दर आहे. बºयाच शेतकऱ्यांनी एक मेकांच्या शेतात पडजी-आडजीच्या कामांना पसंती दिली आहे.

यावर्षी पाऊस चांगला झाला परंतु शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. कांदा रोपे शिल्लक राहिले नसल्याने शेतकरी वर्गाचे आर्थिक गणित बिघडले आहे. पाऊस होऊनही खरीप पिकांतून उत्पादन खर्च सुटणार नाहीत अशी स्थिती आहे. बाजरी पावसात भिजून खराब झाली. काही ठिकाणी मकापिकात पाणी आहे. लाल कांदा लागवड पुर्णपणे खराब झाली आहे. भुईमूग शेतात कुजून गेला आहे.
मका सोंगणी कामे जोरात सुरू झाली आहे. परंतू एक एकर शेतात मका बिट्या दोन टारली निघत आहे. विहिरींना पाणी वाढले आहे. परंतु कांदा रोपे शिल्लक राहिले नसल्याने अजून दोन महिने तरी शेतजमिनी कांदा रोपाअभावी पडीक पडणार आहे. यावर्षी सततच्या पावसाने शेतकरी वर्गाच्या कांदा या नगदी पिकाचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. कोरोना महामारी त्यात वादळी वाºयासह पावसाची भर पडल्याने अस्मानी-सुलतानी संकटात शेतकरी सापडला आहे.
कोट...
यावर्षी पाऊस झाला असला तरी शेतकºयांना पाहीजेत तसे मकाचे उत्पादन मिळणार नाही. पेरणीपासून ते मका सोंगणीपर्यंत मोठ्या प्रमाणावर खर्च झालेला आहे. त्या तुलनेत उत्पन्न न मिळाल्याने शेतकरी तोट्यात राहतील आणि पुन्हा कर्ज बाजारी होतील.
- अरूण अशोक वाघ, शेतकरी, राजापूर.
(फोटो ०५ राजापूर)