अकरावीसाठी सोमवारी दोनशे विद्यार्थ्यांना प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 12:08 AM2018-08-28T00:08:30+5:302018-08-28T00:23:46+5:30

अकरावी प्रवेशप्रक्रियेत नियमित चार आणि एक विशेष फेरी मिळून १४ हजार ५६१ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाल्यानंतर सोमवारपासून (दि.२७) सुरू करण्यात आलेल्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्यच्या फेरीत पहिल्याच दिवशी २०१ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत.

 Access to 200 students on Monday for eleventh | अकरावीसाठी सोमवारी दोनशे विद्यार्थ्यांना प्रवेश

अकरावीसाठी सोमवारी दोनशे विद्यार्थ्यांना प्रवेश

Next

नाशिक : अकरावी प्रवेशप्रक्रियेत नियमित चार आणि एक विशेष फेरी मिळून १४ हजार ५६१ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाल्यानंतर सोमवारपासून (दि.२७) सुरू करण्यात आलेल्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्यच्या फेरीत पहिल्याच दिवशी २०१ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. आतापर्यंत प्रथम पसंतीचे प्रवेश मिळवूनही प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांसह ज्यांना आतापर्यंत झालेल्या ५ फेºयांमध्ये आपल्या पसंतीचे महाविद्यालय मिळू शकले नाही असे ८० टक्के व त्याहून अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांना सोमवारी प्रवेशाची संधी देण्यात आली होती. या संधीचा २०१ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला असून विज्ञान शाखेत १८० व वाणिज्य शाखेत २० विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. तर एका विद्यार्थ्याने एमसीव्हीसी अभ्यासक्रमास प्रवेश घेतला आहे. तर कला शाखेत एकाही विद्यार्थ्याने प्रवेश घेतला नाही. आता २९ आॅगस्टला उपलब्ध जागांवर ६० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाºया विद्यार्थ्यांना व ३१ आॅगस्टला सर्व दहावी पास विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.

Web Title:  Access to 200 students on Monday for eleventh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.