मागास विद्यार्थ्यांना प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2016 11:52 PM2016-02-22T23:52:01+5:302016-02-23T00:02:51+5:30
अंमलबजावणी : शिक्षण अधिकार कायद्यान्वये आजपासून प्रारंभ
कळवण : आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याकारणाने
अनेक मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेता येत नाही, ही अडचण विचारात घेऊन शासनाने अशा विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश देण्याची योजना अमलात आणली आहे.
आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना कोट्यातून २५ टक्के प्रवेश देण्याच्या शासन आदेशाला अनेक शाळांकडून केराची टोपली दाखवली जाते हे लक्षात आल्याने येत्या शैक्षणिक वर्षापासून हे प्रवेश आॅनलाइन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तालुक्यातील १४ शाळांना अशा प्रकारे मोफत आॅनलाइन प्रवेश देणे बंधनकारक आहे. येत्या २३ फेब्रुवारीपासून ही प्रवेश प्रक्रिया प्रत्यक्षात राबविली जाणार आहे.
६६६.१३ी25ंे्रि२२्रङ्मल्ल.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल या वेबसाइडवरून हे प्रवेश निश्चित केले जाणार आहेत. संचमान्यतेसाठी संबंधित शाळांना शिक्षण विभागाकडून देण्यात आलेले यूजरनेम आणि पासवर्ड वापरून ही प्रवेशा प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. यासाठी कार्यक्षेत्रात प्रवेशासंदर्भात मदत केंद्र उभारले जाणार
आहेत.
शासनाने बंधनकारक केलेल्या प्रवर्गातील विद्यार्थी
मिळत नसल्याचे कारण दाखवून हे प्रवेश देण्याचे शाळा टाळत होत्या.
तर काही शाळा त्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे प्रवेश २५ टक्के
कोट्यातून दाखवून फी वसूल करत असल्याने त्याला आता चाप
बसणार आहे. प्रवेशासंदर्भात
कळवण पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांना बोलावून प्रभारी गटशिक्षणाधिकारी एकनाथ पवार व विस्तारअधिकारी पी. पी. महाले यांनी मार्गदर्शन सूचना दिल्या. (वार्ताहर)