पाडळदेत बाहेरगावच्या नागरिकांना प्रवेशबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 11:57 PM2020-04-10T23:57:12+5:302020-04-10T23:59:34+5:30
पाडळदे : ग्रामीण भागातही कोरोनाची प्रचंड दहशत असून, संचारबंदी काळात कुणीही घराबाहेर पडताना दिसत नाही. मात्र शेतीच्या कामासाठी काही लोकांना घराबाहेर पडावे भाग आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पाडळदे : ग्रामीण भागातही कोरोनाची प्रचंड दहशत असून, संचारबंदी काळात कुणीही घराबाहेर पडताना दिसत नाही. मात्र शेतीच्या कामासाठी काही लोकांना घराबाहेर पडावे भाग आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला रविवारी रात्री ९ वाजता सर्व पाडळदेवासीयांनी दिवे, पणती, मेणबत्ती लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सर्व गावातील नागरिकांनी आपल्या घरातील विजेचे दिवे बंद करून घराच्या ओट्यावर बसून पणत्या लावल्या व कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कायमचा नष्ट व्हावा यासाठी मंगल कामना केली.
सध्या २१ दिवसाचं लॉकडाउन सुरू आहे. या काळात सर्व पाडळदेवासीयांनी तंतोतंत पालन करून हा प्रतिसाद दिला आहे. अधूनमधून गावात पोलिसांची वर्दळ चालू असते. दररोज पोलीस वेगवेगळ्या कारणाने गावात फेरफटका मारत असतात. त्यामुळे नागरिक घराच्या बाहेर निघत नाही. खेड्याची वस्ती असल्यामुळे व सर्व शेतकरी, नागरिक असल्यामुळे किरकोळ कामासाठी शेतीच्या कामासाठी घरातील एक किंवा दोन जण कामासाठी जात असतात; पण तेसुद्धा सर्व सामाजिक सुरक्षित अंतर ठेवण्याचे तंतोतंत पालन करत आहे. आपला कोणाला संपर्क होणार नाही व कोणाचा आपल्याला संपर्क होणार नाही ही काळजी घेत असतात. बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांना गावात फिरण्याची मुभा दिलेली नाही. अशा पद्धतीने गावांमध्ये संचारबंदीस पाठिंंबा दिला जात आहे.
जीवनावश्यक वस्तूंची दुकाने व गरजेचे लागणारे सामान एवढीच दुकाने ठरावीक वेळेसाठी उघडी असतात. इतर वेळी रस्त्यावर शुकशुकाट जाणवतो.