पुरामुळे खंडीत विजपुरवठा सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 02:43 PM2019-08-09T14:43:13+5:302019-08-09T14:45:40+5:30

नाशिक, पाऊस व पुरामुळे प्रथमदर्शनी महावितरणचे एकूण उच्चदाबाचे १०६ खांब, लघु दाबाचे १०७ खांब आणि ४६ रोहित्रांचे नुकसान झाले ...

Access to electricity in many places | पुरामुळे खंडीत विजपुरवठा सुरळीत

पुरामुळे खंडीत विजपुरवठा सुरळीत

Next

नाशिक, पाऊस व पुरामुळे प्रथमदर्शनी महावितरणचे एकूण उच्चदाबाचे १०६ खांब, लघु दाबाचे १०७ खांब आणि ४६ रोहित्रांचे नुकसान झाले आहे. नाशिक शहर विभाग १ अंतर्गत पंचवटी परिसरातील मोदकेश्वर तसेच मच्छी बाजारातील, देवी मंदिरासमोरील पाण्यात असल्यामुळे फक्त ३ रोहित्रे बंद असून उर्विरत सर्व भागाचा वीज पुरवठा सुरु करण्यात आला आहे. नाशिक शहर विभाग २ अंतर्गत असलेल्या शहरातील जवळपास सर्वच वीज पुरवठा सुरु असून यामध्ये नदीकाठावरील ११ केव्ही धामणगाव व जायगाव या दोन वाहिन्या पाण्यामुळे बंद असून नायगाव, जाखोरी, जोगलटेंभे व बेलतगव्हाण तसेच नांदूर, जानूर, शिंदे पळसे,ब्राम्हणगाव या परिसरातील नदीकाठचे रोहित्र बंद आहेत. गंगापूर धरण परिसर,गिरनारे परिसरातील लाडाची वाहिनी चे खांब पडल्याने सदर भाग बंद आहे.
नाशिक ग्रामीण विभाग परिसरातील इगतपुरी उपविभागातील सांजेगाव ११केव्ही वाहिनीचा खांब पडल्यामुळे सिरसाठ व कुशेगाव या गावातील वीज पुरवठा बंद आहे.पेठ उपविभागातील सिंदरी उच्च दाबाचा खांब पडला आहे. तसेच पाण्याखाली केबल असल्यामुळे सायखेडा येथील दोन शॉपिंग कॉम्प्लेक्स बंद आहेत. ३३ केव्हीचे दिक्षी उपकेंद्र येथील विद्युत पुरवठा बंद आहे.
महावितरणच्या नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता ब्रिजपालिसंह जनवीर आण िअधीक्षक अभियंता प्रवीण दरोली यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकारी अभियंते, अभियंते आणि जनिमत्र सातत्याने कार्यरत आहेत. पूर व पावसामुळे संभाव्य अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी विद्युत खांब, वीज संच, रोहित्र, विद्युत वाहिनी अनिधकृतपणे हाताळू नय, आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ संबंधित महावितरणच्या अधिकारी-कर्मचार्यांशी संपर्क साधावा व ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.

 

Web Title: Access to electricity in many places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.