नाशिक बाजार समितीत किरकोळ विक्रेत्यांना प्रवेश बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 03:54 PM2020-03-31T15:54:54+5:302020-03-31T15:56:09+5:30
गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी येणारे शेतकरी, व्यापारी, भरेकरी व भाजीपाला खरेदीसाठी येणा-या ग्राहकांची हजारोंच्या संख्येने गर्दी होत असल्याने कोरोना संसर्गाची भीती व्यक्त केली जात होती. यासंदर्भात तक्रारीही करण्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कोरोना विषाणूंच्या वाढत्या प्रादुर्भावाने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत दैनंदिन भाजीपाला खरेदी-विक्रीसाठी येणारे शेतकरी, व्यापारी, आडते व हमाल मापारी आणि नागरिक यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून, संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्स पाळला जात नाही. त्याचबरोबर वाढत्या गर्दीमुळे बाजार समितीत वाहन कोंडी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीने खबरदारीची उपाययोजना म्हणून किरकोळ शेतमाल विक्री करणाऱ्या शेतकरी व खरेदी-विक्री करणा-या चवली, दलालांना बाजार समितीत प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी येणारे शेतकरी, व्यापारी, भरेकरी व भाजीपाला खरेदीसाठी येणा-या ग्राहकांची हजारोंच्या संख्येने गर्दी होत असल्याने कोरोना संसर्गाची भीती व्यक्त केली जात होती. यासंदर्भात तक्रारीही करण्यात आल्याने अखेर यावर तोडगा काढण्याचे ठरविण्यात आले. त्यासाठी यासंदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी पोलीस अधिकारी, बाजार समिती संचालक तसेच व्यापारी यांच्यात संयुक्त बैठक घेण्यात आली. पेठरोडवर असलेल्या बाजार समितीत दैनंदिन टमाटा, कांदा, बटाटा, द्राक्ष, डाळिंब यांचे तर दिंडोरी रोडवरील मुख्य बाजार समितीत फळ व पालेभाज्यांचे लिलाव होतील. ज्या शेतकऱ्यांना लिलावात भाजीपाला विक्री करायचा नाही तो किरकोळ विक्री करायचा अशा शेतक-यांना दोन्ही बाजार समितीत नो एंट्री असून, अशा शेतक-यांनी त्यांचा शेतमाल मनपाने ठरवून दिलेल्या ४३ अधिकृत जागेवर विक्री करावा. दोन्ही बाजार समितीत किरकोळ खरेदी-विक्री करणा-या चवली, दलालांना बंदी करण्यात आली. किरकोळ खरेदीसाठी दुचाकी वाहनाला बाजार समितीत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. बाजार समितीने हमाल, मापारी यांना ओळखपत्र द्यावे. किरकोळ भाजीपाला विक्री बंद असल्याबाबत बाजार समितीत फलक लावण्यात यावा तसेच किरकोळ विक्री करणाºयांवर कारवाई करणे, बाजार समिती सचिवांनी वाशी, नवी मुंबई येथील बाजार समिती संपर्कात राहून तेथील घडामोडी तसेच किती वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे.