मंदिरात प्रवेश नाकारला; पाच जणांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 12:54 AM2018-05-22T00:54:11+5:302018-05-22T00:54:11+5:30

इगतपुरी : तालुक्यातील तळोघ येथील सार्वजनिक विठ्ठल मंदिरात प्रवेश करण्यास मनाई करणाऱ्या ५ जणांविरोधात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात आगरी समाजातील प्रतिष्ठित विश्वस्त रतन लंगडे यांच्यासह तळोघचे पोलीसपाटील वामन लंगडे यांचा समावेश आहे.

Access to the temple was denied; Crime against five | मंदिरात प्रवेश नाकारला; पाच जणांविरुद्ध गुन्हा

मंदिरात प्रवेश नाकारला; पाच जणांविरुद्ध गुन्हा

Next
ठळक मुद्देएका विशिष्ट जमावाने ग्रामस्थांना प्रवेश नाकारून देवदर्शन घेण्यापासून रोखले.पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

इगतपुरी : तालुक्यातील तळोघ येथील सार्वजनिक विठ्ठल मंदिरात प्रवेश करण्यास मनाई करणाऱ्या ५ जणांविरोधात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात आगरी समाजातील प्रतिष्ठित विश्वस्त रतन लंगडे यांच्यासह तळोघचे पोलीसपाटील वामन लंगडे यांचा समावेश आहे.
तळोघ येथे जवळपास ५० वर्षांपासून विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आहे. या सार्वजनिक मंदिरात एका विशिष्ट जमावाने ग्रामस्थांना प्रवेश नाकारून देवदर्शन घेण्यापासून रोखले. यामुळे ग्रामस्थांच्या धार्मिक भावना दुखावल्या असल्याची तक्रार जनार्दन कल्याण लंगडे यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी संशयित आगरी समाजाचे रतन गंगाराम लंगडे यांच्यासह तळोघचे पोलीसपाटील वामन बाबूराव लंगडे, दौलत वाळू जोशी, रमेश कुंडलिक लंगडे, भगीरथ बाबूराव लंगडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मुकेश महिरे, एस.एस. लोहरे, विनोद गोसावी करीत आहेत.

Web Title: Access to the temple was denied; Crime against five

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस