बेलगाव कुऱ्हे रस्त्यावर अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:16 AM2021-06-09T04:16:55+5:302021-06-09T04:16:55+5:30

अपघातातील जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. व्हीटीसी फाटामार्गे बेलगाव कुऱ्हे रस्त्यावर अस्वली स्टेशनकडून भरधाव ...

Accident on Belgaum Kurhe Road | बेलगाव कुऱ्हे रस्त्यावर अपघात

बेलगाव कुऱ्हे रस्त्यावर अपघात

Next

अपघातातील जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. व्हीटीसी फाटामार्गे बेलगाव कुऱ्हे रस्त्यावर अस्वली स्टेशनकडून भरधाव वेगाने येत असताना मोटारसायकल (क्रमांक एम.एच. १५, एच.जे. ०२४८) ने समोरून येत असलेल्या मोटारसायकलला (क्रमांक एम.एच.१५, डी.आर. ६५२१) जोरदार धडक दिल्याने अपघातामध्ये रमेश रामभाऊ गावित (४०), साहिल रमेश गावित (१२), विनायक रमेश गावित (६) सर्व रा. विल्होळी तर बाळू कोकणे (४५, रा. जानोरी, ता. इगतपुरी) असे चार जण जखमी झाले असून यापैकी साहील व विनायक ही दोन मुले किरकोळ जखमी झाली आहेत. गोंदे फाटा येथील जगतगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या मोफत रुग्णवाहिकेचे चालक निवृत्ती गुंड यांना सदर अपघाताची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी दाखल होत जखमींना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

इन्फो

दिशादर्शक फलकाची मागणी

व्हीटीसी फाटा ते दारणा धरण या ८ किलोमीटर रस्त्यावर अनेक वळणदार मार्ग असून या रस्त्याने नेहमीच गोंदे दुमाला तसेच वाडिव-हे येथील औद्योगिक वसाहतींमध्ये कामगारांची रात्रंदिवस वर्दळ असते. या रस्त्यावर दिशादर्शक फलक नसल्यामुळे नेहमीच अपघात होत असतात. काही दिवसांपूर्वीच व्हीटीसी फाट्याजवळील एका कंपनीजवळ असलेल्या वळणदार मार्गावर कंटेनर पलटी झाल्याची घटना घडली होती. या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

फोटो- ०७ बेलगाव कुऱ्हे ॲक्सिडेंट

व्हीटीसी फाटा ते बेलगाव कुऱ्हे या रस्त्यावर झालेल्या अपघातात मोटारसायकलची झालेली अवस्था.

===Photopath===

070621\07nsk_64_07062021_13.jpg

===Caption===

फोटो- ०७ बेलगाव कुऱ्हे ॲक्सीडेंटव्हिटीसी फाटा ते बेलगाव कुऱ्हे या रस्त्यावर झालेल्या अपघातात मोटरसायकलची झालेली अवस्था.

Web Title: Accident on Belgaum Kurhe Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.