कार दुभाजकावर आदळून अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:14 AM2021-05-27T04:14:43+5:302021-05-27T04:14:43+5:30
-------------------- पेट्रोल दरवाढीमुळे सर्वसामान्य हैराण नांदूरशिंगोटे : पेट्रोल व डिझेलचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहे. ...
--------------------
पेट्रोल दरवाढीमुळे सर्वसामान्य हैराण
नांदूरशिंगोटे : पेट्रोल व डिझेलचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहे. तसेच वाहनचालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पेट्रोल, डिझेलच्या भाववाढीमुळे सामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले असून पेट्रोल डिझेलची दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी नागरिक, वाहनधारकांमधून होत आहे.
-------------------
ढगाळ वातावरणाने उकाड्यात वाढ
नांदूरशिंगोटे : येथे व परिसरात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. यामुळे उकाडा वाढला आहे. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. शेतीच्या मशागती पूर्ण झाल्या आहेत. हवामान विभागाने ही पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकरी आता पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
------------------
विनामास्क न फिरण्याचे आवाहन
नांदूरशिंगोटे : येथे व परिसरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होत असल्याने, नागरिक बिनधास्त मास्क न लावताच फिरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. नागरिकांनी गाफील राहू नये, असे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे. तरीही नागरिक अद्यापही नियम मोडून वावरत असल्याचे चित्र आहे.
------------------
खते, बियाणांसाठी जुळवाजुळव
नांदूरशिंगोटे : खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला वेग आला असून, शेतकऱ्यांची बियाणे, खते खरेदीसाठी लगबग करत आहे. मागील हंगामात रोगांनी पिकांवर आक्रमण केल्याने नुकसान झाले होते. काही भागात अतिवृष्टी झाल्याने उत्पादनात घट झाली. यातून शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले होते. शेतीसाठी पैशाची गरज असल्याने शेतकरी पीक कर्जासाठी बँकांची उंबरठे झिजवत आहेत.
---------------------
नांदूरशिंगोटेत लसीकरण
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे ४५ वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. पंचायत समितीच्या सभापती शोभा बर्के यांनी लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभागाकडे मागणी केली होती. ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभाग यांच्या वतीने येथील जिल्हा परिषद शाळेत ९९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.