येवला-उंदिरवाडी बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 06:53 PM2019-06-01T18:53:17+5:302019-06-01T18:53:33+5:30
जीवितहानी नाही : चालकासह १५ प्रवासी जखमी
येवला : येथील आगाराची येवला-उंदीरवाडी बसचा नांदेसर गावाच्या पुढे स्टेअरिंग रॉॅड तुटल्याने बस बाजूला असलेल्या खड्डयात गेल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसून जखमी प्रवाशांवर येथील ग्रामीण रु ग्णालयात उपचार करून सोडून देण्यात आले.
शनिवारी (दि.१) सकाळी ९ वाजेच्या सुमारास येवला आगारातून निघालेली येवला-उंदीरवाडी बस नेहमी प्रमाणे काही प्रवाशी घेऊन उंदिरवाडी येथे वेळेत पोहचली व त्यानंतर उंदीरवाडी येथून २० ते २५ प्रवासी घेऊन येवला आगाराच्या दिशेने परतत असताना नांदेसर सोडल्यानंतर बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटला. त्यानंतर ही बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या खडड्यात गेली. या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही, मात्र चालकासह १५ प्रवाशी जखमी झाले आहे. त्यांना येवला ग्रामीण रु ग्णालयात दाखल करून प्रथम उपचार करून किरकोळ जखमींना घरी सोडून देण्यात आले. या अपघातात बसचे मोठे नुकसान झाले आहे.