गोंदे फाटा येथे कंटेनरचे टायर फुटल्याने अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:22 AM2021-05-05T04:22:38+5:302021-05-05T04:22:38+5:30
सदर घटना सोमवारी (दि.३) सायंकाळी ६.१५ वाजेच्या सुमारास घडली. नाशिक-मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे फाटा येथे नाशिकहून मुंबईकडे भरधाव ...
सदर घटना सोमवारी (दि.३) सायंकाळी ६.१५ वाजेच्या सुमारास घडली. नाशिक-मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे फाटा येथे नाशिकहून मुंबईकडे भरधाव वेगाने जात असताना कंटेनरचे (क्रमांक एम.एच.०४, एफ.पी.७३६४) टायर फुटल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. सदर कंटेनर दुभाजक तोडून महामार्गावरच आडवे झाल्यामुळे काही काळ वाहतूक थांबली होती. इगतपुरी तालुक्यातील सर्वांत मोठी औद्योगिक वसाहत म्हणून ओळख असलेल्या गोंदे दुमाला येथे नेहमीच कामगारांची वर्दळ असते, तसेच भाजीपाला, किराणा आदी कामांसाठी या ठिकाणी नागरिक गर्दी करतात. सुदैवाने या अपघातात दैव बलवत्तर म्हणून मोठी घटना टळली असल्याचे येथील प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
डाव्या बाजूस हाॅटेल, किराणा दुकाने, गॅरेज, भाजीपाला मार्केट असल्यामुळे मोठी हानी टळली आहे. गोंदे दुमाला ते विल्होळीदरम्यान अपघातांची मालिका सुरूच असून, याआधीदेखील या परिसरात अनेक अपघातांच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. दरम्यान, अपघातानंतर काही वेळातच स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने हायड्रा मशीनने सदर कंटेनरला बाजूला करीत वाहतूक सुरळीत करण्यात आली.
फोटो- ०३ गोंदे ॲक्सिडेंट
नाशिक-मुंबई या राष्ट्रीय महामार्गावर टायर फुटल्याने कंटेनरची झालेली अवस्था.
===Photopath===
030521\03nsk_36_03052021_13.jpg
===Caption===
फोटो- ०३ गोंदे ॲक्सीडेंट नाशिक-मुंबई या राष्ट्रीय महामार्गावर टायर फुटल्याने कंटेनरची झालेली अवस्था.