...अशी घडली दुर्घटना (घटनाक्रम)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:15 AM2021-04-22T04:15:10+5:302021-04-22T04:15:10+5:30

११ : ५० वा. टाकीमध्ये ऑक्सिजनचा भरणा करण्यासाठी टँकर दाखल ११: ५५ वा. खासगी तंत्रज्ञांच्या पथकाचे गळतीकडे वेधले गेले ...

... accident happened (chronology) | ...अशी घडली दुर्घटना (घटनाक्रम)

...अशी घडली दुर्घटना (घटनाक्रम)

Next

११ : ५० वा. टाकीमध्ये ऑक्सिजनचा भरणा करण्यासाठी टँकर दाखल

११: ५५ वा. खासगी तंत्रज्ञांच्या पथकाचे गळतीकडे वेधले गेले लक्ष.

दु:१२:०५ वा. टाकीचा मुख्य पाईप फाटल्यामुळे ऑक्सिजनची गळती होऊ लागल्याचे स्पष्ट.

दु: १२:१० वा. सर्वत्र मोठ्या प्रमाणात धुराचे लोट उठले. संपूर्ण परिसर धुरात हरविला.

दु: १२ : १५ वा. मनपा अग्निशमन दलाला घटनेचा ‘कॉल’

दु:१२: २० वा. अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल.

दु: १२: ३० वा. टाकीचा फुटलेला पाईप बदलण्यासाठीचे प्रयत्न सुरु

दु: १२: ३० वा. जिल्हा शासकीय रुग्णालयातून १५ जम्बो ऑक्सिजन सिलिंडर घेऊन वाहन दाखल

दु: १२ :४० वा. झाकीर हुसेन रुग्णालयाच्या द्वारावर रुग्णवाहिकांची गर्दी

दु:१२:४१ वा. नातेवाईकांकडून रुग्ण अन्यत्र हलविण्यास प्रारंभ

दु: १:०० वा. रुग्णांच्या नातेवाईकांचा आक्रोश

दु: १:१५ वा. रुग्णालयाच्या परिसरात दंगल नियंत्रण पथकाला पाचारण

दु: १ :२५ वा. अतिरिक्त दोन जम्बो ऑक्सिजन सिलिंडर घेऊन वाहन दाखल

दु: १:३८ वा. जम्बो सिलिंडर जोडणी पूर्ण; ऑक्सिजन पुरवठा सुरु

दु:१:४८ वा. १३ मेट्रिक टन इतके ऑक्सिजन घेऊन टँकर (एम.एच १६ अेई ७५७३) रुग्णालयात दाखल.

दु:१: ५५वा. नादुरूस्त पाईप बदलून टाकीची दुरुस्ती पूर्ण

दु:१: ५७ वा. मनपा आयुक्त कैलास जाधव यांचे आगमन

दु:२:०१ वा. टँकरमधून ऑक्सिजनचा टाकीत भरणा सुरु

दु: २:१५ वा. टाकीतून ऑक्सिजनचा पुरवठा रुग्णालयात पूर्ववत सुरु.

दु: २:२० वा. पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय दाखल; बंदोबस्त वाढविण्याचे दिले आदेश

दु:२:२५ वा. जिल्हाधिकारी सुरज मांढरे दाखल

दु:२:३० वा. बघ्यांची गर्दी व नातेवाईकांची समजूत काढत रुग्णालयाचे वाहनतळ केले रिकामे

दु:३:००वा. मृतदेह घेण्यासाठी रुग्णालयात शववाहिका दाखल

दु:३:०९वा. जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ रुग्णालयात.

Web Title: ... accident happened (chronology)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.